ब्लॉगकट्टा

Netbhet.com

बुधवार, ३ मे, २०१७

भिंतीवर
आज काल ईथल्या भिंतींवर उडतात फक्त शिंतोडे
आदळतात ईथे रोज शब्दांचे तडाखे

जातात रोज नव्याने भिंतींना तडे
आणि लटकतात ईथे फक्त जख्मी मने

उमटतात ईथे फक्त ओरखडे
आणि वावरतात ईथे फक्त, खुनशी मने

शिंतोडे गटा-गटातले, एक-मेकातले
धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, पक्षांच्या

ज्याचे त्याचे आपले नायक
ज्याचा त्याचा आपला झेंडा

प्रतिमा सगळ्यां कडे
मिरवतो, लटकवतो

त्यांच्या सारख दिसायच
घोषणा देत फिरायच

बस एवढच जमत
त्यातच छाती फुगते

खरा आदर्श घेतो कोण ?
त्यांची शिकवण घेतो कोण ?

ते माहानच होते..पण
स्व:कष्टाने, मेहनतीने

संघर्ष केला, मात केली
ज्ञान मिळवले, सिद्ध केले

ते ही...
कुठल्याही टेकू विना

त्यांच्या इतक कणभरच
जरी कमावल आपण

तरी खुप कमावल
खुप सुधारलो आपण

मग ना गरज टेकूची
ना घोषणांची ना झेंड्याची 

ना द्वेष उरे ना तेढ
ना शिंतोडे ना तडाखे

उरतील फक्त प्रसन्न मने
भिंतींवर फक्त मैत्री सुमने.
........मित्र रसिक (मं.मे)

रविवार, २३ एप्रिल, २०१७

-----पुस्तके-----

मला प्रश्न पडले होते
सगळयांनाच पडतात
समोरच असतात , रोज

आता उत्तर हव
सगळ्यांनाच

कारण उत्तरपत्रिका
भरुन द्यावीच लागणार
पण अट एकच
ज्यांनी प्रश्न पत्रिका दिली
थेट त्यांना नाही विचारायच
काय आहे, काय असेल
विचार विचार विचार

आता शोध सूरु

बाबा, आई, काका
ताई, दादा, मित्र
सगळ्यांना विचारल
पण नीटस काही
मिळाल नाही

अगदी NET वर ही शोधल

पण जाळच ते
अडकवणारच
गोंधळ गुंता नुसता

मिळाल शेवटी

तेही बखोटीलाच
बँगेत माझ्याच
बऱ्याचदा खुणावत होत
बोट लावून कोणी जस

वाटायच
काय बोचतय

आज हाती घेतल
वाचून काढल

पालटून
पान अन पान

मिळाली मिळाली
अचूक उत्तरे
पुढ्यातल्या प्रश्नांची
शिवाय ईतरही
माहीत नसलेली

पटल मग
कधितरि ऐकलेल

वाचाल तर वाचाल

मग काय
छंदच नवा
नवी जुनी
वाटेल ती
मिळतिल ती
पुस्तका मागून पुस्तके

पुस्तके पुस्तके पुस्तके

.......वाचक रसिक(मं)

बुधवार, २२ मार्च, २०१७

तुझाच आहे मी 
दूर असलो जरी
बोलत नसलो तरी
बघ तुझ्याच पाशी
आहे तुझ्याच मनी
अन तु माझ्या मनी
माझ्या मनी तेच
जे तुझ्या मनी
ओढ तीच
तीच तहान
तुझ्या माझ्या
मैत्रीची जाण
असेन मी
कोणी तरी
आपल  म्हणूनी
साथ निरंतर
सुख दु:खात
मन गुज
उमलुदे सहज
साथीत ,मैत्रीत
सखी तु
अन मी सखा
....सखा रसिक(मं.मे)

शनिवार, १८ मार्च, २०१७

रंगी रंगला रंग
रंगी रंगले अंग
रंगावरी उडे रंग
उतरला तन रंग

प्रीत रंग नयनी
मन रंगे गुलाबी
रंग पाश भोवती
अंग अंग लाली

सखा सावळा हरी
रंगते राधा सखी
वेणू नाद रंगी
नाचते घुमते बावरी

गोप गोपास रंगवी
गोपाळ रंग रंगी
गोप गळा भेटी
रंगात रंग घोळूनी
......रंगतो रसिक(मं मे)
-----------------------------------


रंग सारे अनोखे
मनमोहक एक एक
लुभाते, ललचाते, फिर भी

प्रेम रंग असली
दोस्ती रंग असली

एक मुस्कान सामने
गाल, गुलाल चढे
पी लेती दुख सारे
प्रेम नजर गहरी
सहलाता हात हलके
सप्तरंगी बौछार
झप्पी दोस्तकी
सुनहरी उमंग
चढते, खिलते रंग
हर एक अधिक
घुलमिल आए जब
प्रेम, दोस्ती संग

प्रेम रंग असली
दोस्ती रंग असली
……..रसिक दोस्त(मं मे)
-----------------------------------
रंग सारे अनोखे
एकाहूनी एक मोहक
खुणावती, भुलवती, तरी

रंग प्रेमाचा अस्सल
रंग दोस्तीचा अस्सल

स्मित एक पुढ्यात
गाली चढे गुलाल
नजर एक प्रेमळ
दु:ख शोषूनी गडद
स्पर्श हलका खांद्यावरी
सप्तरंगी उधळण
गळा भेट दोस्ताची
मन रंगते सोनेरी

रंग चढतो, खुलतो
हर एक अजुनी
घोळूनी प्रेम रंगी
घोळूनी मैत्री रंगी

रंग प्रेमाचा अस्सल
रंग दोस्तीचा अस्सल
.......रसिक दोस्त(मं)

बुधवार, ८ मार्च, २०१७

तु गुलाब पाठवतेस
शुभेच्छा, प्रेम म्हणून
पण, खरतर
तुच एक गुलाब आहेस
माझ्यासाठी,
आयुष्यात माझ्या
सुवासिक, टवटवीत
सुख फुलवणारा
तुच का ?
साऱ्याच तुझ्या सारख्या
प्रत्येकाच्याच जीवनी
असतात सखी म्हणूनी
बस, ईतकेच म्हणेन
रहा अशीच,
भेट अशीच
धन्यवाद सखी
.......रसिक सखा(मं मे)

---------------------------------
आदिशक्ती जगदंबा
महाकाली चंडीका
लक्ष्मी रुपी श्री माता
श्री शारदा सरस्वती
त्राहीमाम, माते
त्राहीमाम त्राहीमाम
रक्ष रक्ष देवी दूर्गे
संकटी लेकीस तव
असूरी घात सर्वत्र
मस्तवाल दानव
म्हैषासुर वंश घोर
त्राहीमाम , त्राहीमाम
धाव धाव माई माते
दैत्य संहार गे आई
दानव मर्दिनी यावे
उदो उदो तुझा माये
हे दूर्गे , हे अंबे
जय काली, जय भवानी
जगदंब जगदंब
आई भवानी मातेचा, उदो उदो
.........भक्त रसिक(मं)


विरश्री तेजो विजय
पुरूषोत्तम पुरूषार्थ विजय
जननी शक्ति चंडी विजय
धर्म विजय सत्य विजय


घनश्याम तु, मी व्याकूळ जननी
शुष्क अधर, आटली छाती
भेगाळली ही काया अवघी
तळमळती जीव, प्राण कंठी,
अपराध माझा सांग जरा
लेकूरे सांगती टाहो फोडूनी
ये आता ये पाझर होऊनी
..........मंगेश मेढी
..........३-५-१६

गुरुवार, २ मार्च, २०१७

-----सेल्फि----
मुली आणि सेल्फी
न सुटणार कोड
अगदी……
त्यांच्या सारखच
रोज रोज काढून , दाखवून
बदलणार थोडच
पण...........
हाऊस, उत्साह संपते कुठे
बदलते फक्त
मान खालची वर
इकडची तिकडे
अन, नजरेचा कोन
कधी, कधी तर....
कपडेही तेच...
नखराही तोच                                                        
नजराही त्याच
नविन असतो तो
फक्त दिवस अन कॅमेरा

....मुली अन सेल्फी
न सुटणार कोड....
अगदी त्यांच्या सारखच
रोज रोज काढून , दाखवून
बदलणार थोडच

पुन्हा एक पोझ, अदा
पुन्हा एक क्लिक
पुन्हा एक रुप नवे
तसेच सुंदर, हौशी
उत्साही, फुललेले
अन........।
घायाळ, वेडावले
बेहोश किती
चमक नयनी तशीच
तीर आरपार किती
अधरी प्याले गुलाबी
 प्याल्यात नव्या
मदीरा जुनीच
नशेत बुडाले किती
बहकले किती

मुली आणि सेल्फी
न सुटणार कोड
अगदी……
त्यांच्या सारखच
रोज रोज
काढून, दाखवून
बदलणार थोडच

अजुन एक नखरा
अजुन एक झलक
आज काय तर
भिरभरती बट
खेळती गाली
मान वळवूनी
खळखळते कशी
बहाणे नवे नवे
रोज रोज एक
जोणतो आम्ही
अन तो ही
टिपतो तरीही
छंदी तो ही
अन तु ही

मुली आणि सेल्फी.........
न सुटणार कोड
अगदी……
त्यांच्या सारखच
रोज रोज
काढून, दाखवून
बदलणार थोडच..........

आज काय, तर
आवडता रंग
तो ही खुप दिवसांनी रे
म्हणून म्हटल
घ्यावी एक
नको नाहीच
ठरवल होत
पण......
आता एकदाच
म अगदी स्पे. असेल
तरच , खरच

हमम, ठीक ए ठीक ए
चल , घेतो बघु
अ....! हा$$$$ !
Ok ?
खर तर
तूच आवडती
रंगांची
खुलतात तुझ्यावर
अधिकच
म कोणताही असुदे
म मलाही राहवत नाही
वाटच बघत असतो
कधी एकदा टिपतो ते

मुली आणि सेल्फी
न सुटणार कोड........

परत परत परत
सेल्फि सेल्फि सेल्फि
मोह काही संपणार नाही
तुमचा ना कॅमेराचा
ना आमचा बघायचा
काय करणार
तुम्हाला बनवलयच मुळी
मोहात पाडायला

मुली आणि सेल्फी.....

अरे यार परत,
परत परत
तुमची हौस होते , होते मजा
आम्हाला मात्र सजा
असे तीर सोडायचे
जख्मी करायचे ,
एवढ छान एवढ गोड
दिसायच परत परत

मुली आणि सेल्फि
न सुटणार कोड........

आता वेडावलो आम्ही ही
पाहतो रोज रोज
प्रतीक्षा ही रोजचीच
आज काय नविन ?
आजची पोज कुठली ?
आजचे रुप कसे ?
आजची सेल्फी कशी
मुली आणि सेल्फी.......
;)
......फसतो रसिक (मंगेश)
……गुंग रसिक....गुंतलेला रसिक.... ;) :)
……गुंग रसिक....गुंतलेला रसिक.... ;) :)

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

मी अन भाषा माझी

सप्रेम नमस्कार विनंती विशेष
लिहिण्यास कारण कि....
टाहो फोडे माता......
माता आपली, माय मराठी
समृद्ध वैभव सपन्न अशी
एक एक अक्षर जणु रत्न
स्वतंत्र नाम स्वर लेवून
स्वरास व्यंजनाची जोड
इथूनच रुजते क्रांती बीज
स्वाभीमान स्वातंत्र्याचे रोप
त्यातूनच घडतात शब्दालंकार
गुंफुनी सजतात साज
का मग मोडावा आपणच
आपल्या मातेचा शृंगार ?

गुलामीत परभाषेच्या
घुसडून ते परशब्द

आता "रुम" चेच बघा
ह्यात ना ती खोली
ना आपलेपणा
धर्मशाळेचा भास होतो
"बाथरुम" म्हटल की
तुरुंगच आठवतो
"किचन" जणु बेड्या, शिक्षा
"रोड" वाटे गडगडलो रे,
हरवलो, चुकलोच आता
रस्ता कसा प्रशस्त
खात्रीशीर प्रवास
गाठणारच पाडाव
"कलर" म्हणजे उडणारच
"रंग" ने कसे छान
खुलते सभोवताल, आकाश
"ड्युड", "बडी", "गाइज"
ही तर खेळणी नकली
"दादा", "भाऊ", "मित्रांनो"
एक आधार, साथ, सुसंगत

अशी.... अकारण
एक ना अनेक आक्रमण
का करावी वाणी भ्रष्ट

आज हा संकल्प माझा
नको परशब्द
नको गुलामी
स्वतंत्र स्वाभीमानी
मी अन भाषा माझी
.......रसिक लेकरु(मं.मे)

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

राम नाम
राम राम बोले हे मन
राम राम चित्ती हा जप
राम नाम हे शिव स्तवन
राम नाम शमवे विषदाह

राम नाम एक आधार
राम नाम जन्मोद्धार
राम नाम हे मोक्षद्वार
राम नाम शांती धाम

राम नाम घेता सुटे
मोह-पाश अन घोर-पाप
राम नाम अमृत पान
राम नाम मुक्तीद्वार

राम नाम घ्यावे नित्य
राम जप अंतरी निरंतर
हाच धर्म हेच कर्म
कलियुगे एक हा यज्ञ

फल प्रसाद सदा-सर्वहित
॥ जय श्रीराम ॥ ॥ जय श्रीराम ॥
...मंगेश मेढी.

---------------------------------------------------
दिंडी चालली
टाळ वाजती वाजती । पायी नाचती नाचती
नाम गाती भजती 
।  वैष्णव डोलती डोलती 

दिंडी चालली चालली चालली

गुढी उंच गगनी । घाट वाट चढती
माऊली गजर नभी । विठू भेटी चालली


दिंडी चालली चालली चालली


तुम्हा ठायी येता । माग मागे जाता
वारी वाट सेवा । तुम्हा पायी माथा
देह भान काया । हरपल सार नाथा


दिंडी चालली चालली चालली

मंथन हे रिंगणी । मोह माया तुडवी
भक्ती रसे आवडी । अमृताचे गोडी
धावतो धावतो । रिंगणी वारकरी


दिंडी चालली चालली चालली

वाट सरली आस पुरली
कळस देखइला भेटली पंढरी
चरणी भीमा तीर्थ उभे परब्रह्म
पांडूरंग पांडूरंग विठ्ठल विठ्ठल

......मंगेश मेढी.


अवतरली भागीरथी, देहू आळंदी
वाहे भक्ती गंगा, वाट पंढरी

भरती प्रेमाची, लाट भेटीची
नाम अभंगान खळखळते वारी

भवती पसरला पसारा
कण एक तयात
कण कणासंगे वाहे
मिळे सागरी ओघळ

प्रेम प्रेमास भुकेले
भेटीस विठू ताटकळे
भक्त चाले, धावे ओढीन
आस वरसाची सरे
........भक्त मी वारकरी(मंगेश)



ईठुबा संग हूबी रकूमाई
ग्वाड हसू, हात कमरवरी

सांगतो जनु, हा हित मी
भिवू नग हास म्हाया परी

ओढ ईँद्रायणीस विठू भेटीची
वाहते मिसळते चंद्रभागेमाजी
डमडम डमडम डमरू वाजे
शिंग, शंख, नाद फुंकले
विभूती उधळे, शिवगण डोले
साधू, भक्त, भूत दानव
देव, गंधर्व वऱ्हाडी पुढे
मूषक, नंदी, गणेश सजले
महादेव सज्ज स्वार झाले
नंदीराज ऐटीत निघाले
ढोल, नगारे तुतारी घंटा
डमडम डमडम डमरू वाजे
भांग रसपान जमके
भक्तगण जीवजंतु झुमे
मस्त धुंद नटराजही नाचे
नवरी नटली, माता लाजे
शुभ पर्व महापर्व
महारात्र सजे जागे
महाशिवरात्री जागे
भम भम भोले
भम भम भोले
हर हर महादेव
हरहर महादेव
.......रसिक भक्त(मं)


कर्पूरगौर करूणाकर
दयाघन भोलेनाथ
आदिगुरू आदिनाथ
कलाधिश नटराज
नृत्यमयी डमरुधर
वीणानाद संगीतेश्वर
ज्ञानसिद्ध योगीराज
चंद्रशेखर, गिरीराज
महाकाल तांडवस्थ
ध्यानस्थ शिव शंकर
मुक्तीदाता भक्तप्रिय
हर हर महादेव
हर हर महादेव

आत्महत्या केलेल्या
गरीब शेतकऱ्याच्या
मुलाची ही कविता
सर्वांनी नक्की वाचा

ही कविता वाचतांना मेंदुवर थोडा ताण पडु द्या, भावनेच्या भरात न जाता खर आणि खोट्याचा थोडातरी विचार करावा.....

गायी-बैलाकडं पाहुन
बाप डोळ्यात पाणी आणायचा,
देवा, दत्ता आतातरी पाव रे
असाच हर वक्ती म्हणायचा,

बाप लय आपुलकीनं सांगायचा
गायीत रायतात ३३कोटी देव,
एव्हढे सारे सोबत असल्यावर
कायला वाटावं शेतकर्याला भेव,

बाप हर वक्ताले कामधंदे सोडुन
पायी-पायी वारीत जायाचा,
लोटांगण घालुन त्या विठ्ठलाले
देवा 'चांगभल' कर म्हणायचा,

बाप सोमवार, शनिवार धरायचा,
श्रावण अन् पोर्णिमा पकडायचा,
रातभर मंदिरात भजन गात
टाळ कुटत काकडायचा,

दरवर्षी प्रमाणं या वर्षी भी
बापाले पुन्हा वरुण देव पावला,
देवान बापाच्या सर्व पिकाचा
एका काठकुन सत्यानास दावला,

धो-धो पडत्या पावसात
बाप लय ढसा-ढसा रडला,
पाणी कोणतं अन् अश्रु कोणते
मले घडीभर ईचारच पडला,

आभाळाकडं पाहत बापानं
देवाला दोन्ही हात जोडले,
अश्रु ढाळीत हुंदके देत
कुर्हाडीनं ढीगभर लाकडं फोडले,

त्या ढीगभर लाकडाचा मले
लय उशीरा अर्थ कळाला,
जवा मव्हा बाप त्या ढीपल्यावर
समशानात ढणढण जळाला,

बाप जळत व्हता सरणावर
माझं मन एकदम सुन्न होतं,
देवा, हे कस काय झालं ?
मनात मोठ्ठ प्रश्न चिन्ह होतं,

म्या, न भिता 'अभय' होवुन
३३कोटी देवाले प्रश्न ईचारला,
मव्हा बाप मरतांना आरं देवा
तु वाचवायले का नाही आला ?

आतापर्यत तुह्या भारतामध्ये
३लाख शेतकर्यानं आत्महत्या केली,
मग, तुह्या ३३कोटी देवायची
फौज रे कुठ गायब झाली ?

साधं सोप्प गणित तुले पण येईल
३३कोटी देव ÷ ३लाख शेतकरी,
गणित कर देवा उत्तर मिळेल
१,१०० देव प्रती १ शेतकरी,

आरं, १,१०० देवायनं मिळुन
काही चमत्कार केला असता,
तर आज शेतात राबणारा
मव्हा कष्टकरी बाप मेला नसता,

देवा, तु एका शेतकर्याचं
रक्षण करु शकत नाही,
मग, तु काहाचा तारणहार
तुही तर लायकीच नाही,

देवा, यानंतर तुले म्या
कही हात नाय जोडणार,
'नाग' अन् शेंदराच्या दगडाले
म्या नारळ नाय फोडणार,

बाप मेल्यावर,
शेतकर्याच्या लेकराले अक्कल दाढ आली,

अन् आज,
मह्या मनाच्या कोर्टात,
मह्या बापाच्या सरणावर,
सर्व ३३ कोटी देवाला
फाशीची सजा झाली,
सर्व ३३ कोटी देवाला
फाशीची सजा झाली....!!!
😔😔😔
कवि अज्ञात
----------------------------
हे वाचुन मला सुचलेले
--------------------
आर भल्या मानसा
मले कायले कोसतो
तुझ्या कर्माची फळ
तुच आज भोगतो
वन, रान कापली
झाड नाय लावली
पहाव तवर निसत
उघड, बोडक माळ
कचा कचा कापून
सिमटीची बांधली
कदर न तुले, रानाची
न वनाची, न मातीची
चटक निसती, पैशाची
जमिनी ईकाची
देव भूमी, माझी
कोकणी राणी
बघ तेनी, राखली
वनी देवराई
काडी, काडी जमून
जगते ते शेतकरी
जाणते ते मोल
पाण्याचे, झाडाचे, निसर्गाचे
जपते त्याले लेकरा वाने
दुष्काळ त्याला बी
संकट त्याला बी
पर लढते ते
ना रडते, ना हरते
ना ईष पिवून मरते
धीरान भागवते
म्हणून मला बी
तिथच राहू वाटते
तू बी लढ
एक तरी माळ
हिरवा फुलव
येईन मी तीथ बी
राह्यला , वस्तीला
दोघ बी, खावू की
म रान मेवा
अन म ठरवू
फाशी देऊ कुना
मला, तुला का
निराशेला, दुष्काळाला
आळसाला, लाचारीला
का भीतीला
......मंगेश मालती- मधुकर मेढी
........तळेगाव , मावळ

काल गुलजारजींचा वाढदिवस होता तर एक व्हिडीओ पाहीला 
"दि बेस्ट ऑफ गुलजार "
पण अस होऊ शकत ?
मला तर नाहीं वाटत तस

हर नज्म जिनकी, हर धडकन सी गूंजती
हर शेर , हर सांस का गीत जिनका

दि बेस्ट ऑफ गुलजार ये हो नहीं सकता है
ऑल आर दि बेस्ट गर उनका है

झुकके सलाम करता मंगेश ये
जैसे ईबादत मे झुकता कैलाश के...
............लीन मै


एक ही विषय पर 5 महान शायरों का नजरिया ....

1- ग़ालिब :
"शराब पीने दे मस्जिद में बैठ कर,
या वो जगह बता जहाँ ख़ुदा नहीं।"

2- इक़बाल :
"मस्जिद ख़ुदा का घर है, पीने की जगह नहीं ,
काफिर के दिल में जा, वहाँ ख़ुदा नहीं।"

3- फ़रज़ :
"काफिर के दिल से आया हूँ मैं ये देख कर,
खुदा मौजूद है वहाँ, पर उसे पता नहीं।"

4- वासी :
"खुदा तो मौजूद दुनिया में हर जगह है,
तू जन्नत में जा वहाँ पीना मना नहीं।"

5- साक़ी :
"पीता हूँ ग़म-ए-दुनिया भुलाने के लिए,
जन्नत में कौन सा ग़म है इसलिए वहाँ पीने में मजा नही।"

क्या बात

गुस्ताकी माफ

खुदा तो हमसफर पर हमे फुरसत नही
रूबरू हुए गर तो पीने की जरूरत नही
........मंगेश मेढी




मावळ माती, आमची मावळ माती
पहाड छाती, चाल घाटाची

शिवबाच्या सैन्याची खेती
रांगड गडी हाती दगड फोडी

मावळा मोती, मुलुख झोडी
मावळ माती, आमची मावळ माती

दरी दरीतूनी ललकारी
हर हर महादेव, हरहर महादेव

जय महाराष्ट्र
....मंगेश मेढी

काळजी करु नका
आपणही तसेच होणार ओ
वय झाल्यावर असच होणार हो
अगदी असच नसल तरी
देव देव नाही केल तरी
फिरता फिरत हात जोडणार ओ
अगदीच काटकसर नसली तरी
तसच साधच जगणार हो
........वयस्क रसिक(मं)


ईतना मुश्कील भी नही खुष रहना
अब भी सब ठीक हो सकता है
बस ईतनीसी समज हो के
महज दो-चार रोटी से मिटती भूख है
शर्त ये , की भूख पेट की ही हो
ना रूतबे की ना गरुर की
ना शौरत की ना ऐय्याशी की
ना पैसे की जायदाद की
हो तो हो सच्चाई कि सादगी की
प्यार कि दोस्ती की, कुदरत के
गीत संगीत की

शायर कई, कह गए
कह गए कितने कबीर
पर गौर कर वो ईस्नान कैसा
नासमजी मे उम्र गवाए
अंधा नशेमे चूर
...हैरान मै




नशीबावान तो ज्यास लाभली ताई मिळते छोटी आई ज्यास लाभली ताई
छान फेस टू फेस भेटतोय की
मग फेसबुक वर कशाला
दूर दूर असतात त्यांना लागत ना हे !....?
दुरावा हवा का तुला

माणूस------
अरे अरे पावसा
किमान बरस तरी आज
जून चालला उलटून
निदान बाळग थोडी लाज !
पाऊस----------
अरे अरे माणसा
विचार कर जरा
दोष मला देताना
दोष तुझे पहा ना
लाज मनी बाळग जरा
हव्यास तुझा मस्ती तुझी
झाडांच्या जागी कॉंक्रीट जंगले
नद्यांची तू केलीस गटारे
ढगांना आता जमवू कसे
इथे मग थांबवू कसे
मग मी येणार कोठून
अन बरसणार कोठून
मंगेश मेढी.

प्रवास
अलगद, हलकेच अगदी नकळत
परत फिरावे, जिरावे
पान पाचोळ्या जश्या मुळाकडे
सर्वस्व लुटून, प्राण फुंकुनी
सोनेरी गालीच्या बनुनी पसरावे
निर्मळ पडतया पावलांना पुढे
तसेच जपुन घेऊन जावे
क्षितिजा पार, स्व:त वा कडे
ज्याच्या त्याच्या मुळाकडे
मंगेश मेढी.

अनुवाद प्रयत्न
रहना नहीं देस बिराना है ।।
यह संसार कागज की पुड़िया
बूँद पड़े घुल जाना है ।
यह संसार काँटों की बाड़ी
उलझ-पुलझ मर जाना है ।
यह संसार झाड़ और झाखड
आग लगे जरि जाना है।
कहत कबीर सुनो भाई साधो
सतगुरु नाम ठिकाना है।।
____संत कबीर
क्षण भंगुर सारे
क्षणात विरले आयुष्य अवघे
आज समक्ष घडले असे
काय योजना अन अडाखे
राहिले ते जिथल्या तिथे
कशास ठेविले प्रस्थान आजी
अन कुठे कसे प्रयाण झाहले
मिथ्थ्या सारे सत्य एकची
क्षण भंगुर सारे, क्षण भंगुर सारे
गुरुजन वदती नित्य सत्य हे
गुरुचरण निजधाम सार हे
मूळ भजन - संत कबीर
अनुवाद - मंगेश मेढी.

-----बदल----
काळ बदलतोय
तशा चाली रीतीही
गमावतोय
मन, समाधान
हवे हवे 
अजुन थोडे
अजुन थोडे
मिळतच नाही
मिळालेच नाही
अस नाही
सारे उपभोगले
सुख, दु:ख
प्रापंचीक, ऐहिक
तरीही,
संधीकाली
मांडतोय
नवा प्रपंच
शोधतोय
नवा, जोडीदार
काळ बदलतोय
तशा चाली रीतीही
खर तर
वाढतोय
भोग, हव्यास !
अन मिळतच नाही
ज्यास तो
भागवतो, तसेच
विना तक्रार
ओढाताण
नित्याचीच
समाधानी तरीही
दिसतो आनंदी
काळ बदलतोय
तशा चाली रीतीही
खर तर
वाढतोय
विरोधाभास

...मंगेश मेढी. २६/१०/१५ ©