ब्लॉगकट्टा

Netbhet.com

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

राम नाम
राम राम बोले हे मन
राम राम चित्ती हा जप
राम नाम हे शिव स्तवन
राम नाम शमवे विषदाह

राम नाम एक आधार
राम नाम जन्मोद्धार
राम नाम हे मोक्षद्वार
राम नाम शांती धाम

राम नाम घेता सुटे
मोह-पाश अन घोर-पाप
राम नाम अमृत पान
राम नाम मुक्तीद्वार

राम नाम घ्यावे नित्य
राम जप अंतरी निरंतर
हाच धर्म हेच कर्म
कलियुगे एक हा यज्ञ

फल प्रसाद सदा-सर्वहित
॥ जय श्रीराम ॥ ॥ जय श्रीराम ॥
...मंगेश मेढी.

---------------------------------------------------
दिंडी चालली
टाळ वाजती वाजती । पायी नाचती नाचती
नाम गाती भजती 
।  वैष्णव डोलती डोलती 

दिंडी चालली चालली चालली

गुढी उंच गगनी । घाट वाट चढती
माऊली गजर नभी । विठू भेटी चालली


दिंडी चालली चालली चालली


तुम्हा ठायी येता । माग मागे जाता
वारी वाट सेवा । तुम्हा पायी माथा
देह भान काया । हरपल सार नाथा


दिंडी चालली चालली चालली

मंथन हे रिंगणी । मोह माया तुडवी
भक्ती रसे आवडी । अमृताचे गोडी
धावतो धावतो । रिंगणी वारकरी


दिंडी चालली चालली चालली

वाट सरली आस पुरली
कळस देखइला भेटली पंढरी
चरणी भीमा तीर्थ उभे परब्रह्म
पांडूरंग पांडूरंग विठ्ठल विठ्ठल

......मंगेश मेढी.


अवतरली भागीरथी, देहू आळंदी
वाहे भक्ती गंगा, वाट पंढरी

भरती प्रेमाची, लाट भेटीची
नाम अभंगान खळखळते वारी

भवती पसरला पसारा
कण एक तयात
कण कणासंगे वाहे
मिळे सागरी ओघळ

प्रेम प्रेमास भुकेले
भेटीस विठू ताटकळे
भक्त चाले, धावे ओढीन
आस वरसाची सरे
........भक्त मी वारकरी(मंगेश)



ईठुबा संग हूबी रकूमाई
ग्वाड हसू, हात कमरवरी

सांगतो जनु, हा हित मी
भिवू नग हास म्हाया परी

ओढ ईँद्रायणीस विठू भेटीची
वाहते मिसळते चंद्रभागेमाजी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा