ब्लॉगकट्टा

Netbhet.com

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

मी अन भाषा माझी

सप्रेम नमस्कार विनंती विशेष
लिहिण्यास कारण कि....
टाहो फोडे माता......
माता आपली, माय मराठी
समृद्ध वैभव सपन्न अशी
एक एक अक्षर जणु रत्न
स्वतंत्र नाम स्वर लेवून
स्वरास व्यंजनाची जोड
इथूनच रुजते क्रांती बीज
स्वाभीमान स्वातंत्र्याचे रोप
त्यातूनच घडतात शब्दालंकार
गुंफुनी सजतात साज
का मग मोडावा आपणच
आपल्या मातेचा शृंगार ?

गुलामीत परभाषेच्या
घुसडून ते परशब्द

आता "रुम" चेच बघा
ह्यात ना ती खोली
ना आपलेपणा
धर्मशाळेचा भास होतो
"बाथरुम" म्हटल की
तुरुंगच आठवतो
"किचन" जणु बेड्या, शिक्षा
"रोड" वाटे गडगडलो रे,
हरवलो, चुकलोच आता
रस्ता कसा प्रशस्त
खात्रीशीर प्रवास
गाठणारच पाडाव
"कलर" म्हणजे उडणारच
"रंग" ने कसे छान
खुलते सभोवताल, आकाश
"ड्युड", "बडी", "गाइज"
ही तर खेळणी नकली
"दादा", "भाऊ", "मित्रांनो"
एक आधार, साथ, सुसंगत

अशी.... अकारण
एक ना अनेक आक्रमण
का करावी वाणी भ्रष्ट

आज हा संकल्प माझा
नको परशब्द
नको गुलामी
स्वतंत्र स्वाभीमानी
मी अन भाषा माझी
.......रसिक लेकरु(मं.मे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा