भिंतीवर
आज काल ईथल्या भिंतींवर उडतात फक्त शिंतोडे
आदळतात ईथे रोज शब्दांचे तडाखे
जातात रोज नव्याने भिंतींना तडे
आणि लटकतात ईथे फक्त जख्मी मने
उमटतात ईथे फक्त ओरखडे
आणि वावरतात ईथे फक्त, खुनशी मने
शिंतोडे गटा-गटातले, एक-मेकातले
धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, पक्षांच्या
ज्याचे त्याचे आपले नायक
ज्याचा त्याचा आपला झेंडा
प्रतिमा सगळ्यां कडे
मिरवतो, लटकवतो
त्यांच्या सारख दिसायच
घोषणा देत फिरायच
बस एवढच जमत
त्यातच छाती फुगते
खरा आदर्श घेतो कोण ?
त्यांची शिकवण घेतो कोण ?
ते माहानच होते..पण
स्व:कष्टाने, मेहनतीने
संघर्ष केला, मात केली
ज्ञान मिळवले, सिद्ध केले
ते ही...
कुठल्याही टेकू विना
त्यांच्या इतक कणभरच
जरी कमावल आपण
तरी खुप कमावल
खुप सुधारलो आपण
मग ना गरज टेकूची
ना घोषणांची ना झेंड्याची
ना द्वेष उरे ना तेढ
ना शिंतोडे ना तडाखे
उरतील फक्त प्रसन्न मने
भिंतींवर फक्त मैत्री सुमने.
........मित्र रसिक (मं.मे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा