ब्लॉगकट्टा

Netbhet.com

बुधवार, ८ मार्च, २०१७

तु गुलाब पाठवतेस
शुभेच्छा, प्रेम म्हणून
पण, खरतर
तुच एक गुलाब आहेस
माझ्यासाठी,
आयुष्यात माझ्या
सुवासिक, टवटवीत
सुख फुलवणारा
तुच का ?
साऱ्याच तुझ्या सारख्या
प्रत्येकाच्याच जीवनी
असतात सखी म्हणूनी
बस, ईतकेच म्हणेन
रहा अशीच,
भेट अशीच
धन्यवाद सखी
.......रसिक सखा(मं मे)

---------------------------------
आदिशक्ती जगदंबा
महाकाली चंडीका
लक्ष्मी रुपी श्री माता
श्री शारदा सरस्वती
त्राहीमाम, माते
त्राहीमाम त्राहीमाम
रक्ष रक्ष देवी दूर्गे
संकटी लेकीस तव
असूरी घात सर्वत्र
मस्तवाल दानव
म्हैषासुर वंश घोर
त्राहीमाम , त्राहीमाम
धाव धाव माई माते
दैत्य संहार गे आई
दानव मर्दिनी यावे
उदो उदो तुझा माये
हे दूर्गे , हे अंबे
जय काली, जय भवानी
जगदंब जगदंब
आई भवानी मातेचा, उदो उदो
.........भक्त रसिक(मं)


विरश्री तेजो विजय
पुरूषोत्तम पुरूषार्थ विजय
जननी शक्ति चंडी विजय
धर्म विजय सत्य विजय


घनश्याम तु, मी व्याकूळ जननी
शुष्क अधर, आटली छाती
भेगाळली ही काया अवघी
तळमळती जीव, प्राण कंठी,
अपराध माझा सांग जरा
लेकूरे सांगती टाहो फोडूनी
ये आता ये पाझर होऊनी
..........मंगेश मेढी
..........३-५-१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा