ब्लॉगकट्टा

Netbhet.com

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

        प्रेम
भांडणात प्रेम असावे
प्रेमात भांडण नको
हट्ट प्रेमाचा असुदे
प्रेमात हट्ट नको


हक्क प्रेमाचा असुदे
प्रेमात हक्क नको
प्रेमळ वाद होवो
प्रेमात वाद नको

वाटा प्रेमाचा रहावा
प्रेमात वाटा नको
प्रेम बंध जुळावे
प्रेमात बंधन नको

खोट असल असुदे
प्रेमात खोट नको
आग प्रेमाची पेटुुदे
प्रेमात दाह नको
..........प्रेमात रसिक(मं.मे)

तु ईतक छान, सुंदर असाव
कि माझ्या कवितेनही प्रेमात पडाव

सहसा पटत नाही अप्सरांच
हिने चक्क तुझ गुणगान गाव
.....मंगेश


नजरेच अन ओठांच
छान जमत तुझ्या
पाहीले कुठे तरी
भेटते मन आनंदी


डोळ्यांचे आणि ओठांचे तुझ्या छान जमते 
पाहीले कुठे तरी, स्मित च छान दिसते 
.......मंगेश


:-)तू ऐलतीरी
नजर पैलतीरी
सजवते रंग फुले
स्वप्नाळू ती रमते
......मंगेश



नजरेत खोड तुझ्या
हसतेस गोड
नजरेचा कोन तुझ्या
पाहतेस कोण
.........मंगेश

तिला सारेच ठाऊक
काही न सांगावे
तेवढ्याचे एवढे
तिनेच तर केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा