ब्लॉगकट्टा

Netbhet.com

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

------झिंग------
अशी किक बसूदे
अशी तार लागूदे
पेटूदे तिकड जळूदे
मरुदे आग लागूदे
झिंगूदे मला झिंगूदे

घे डबल मळ
ए दे की
बघू बीडी हिकड
एक कश दे की
हाऽऽऽऽ
गुटका हाय का
आर दे की
अशी किक बसूदे
झिंगूदे मला झिंगूदे

काढ काटर काढ
फोड बाटली
आण थोडी घेवूदे
घे रे, वढ तू भी
जावूदे ना बडूदे
अशी मस्त चढूदे
झिंगूदे मला झिंगूदे

आण आजून एक
फोड ना फुडची
एकीन काय व्हनार
बाटली मागून बाटली
सकाळ दुपार रातीला
आशी किक बसूदे
चढूदे मस्त चढूदे

वाघ ए मी वाघ
पघू कोन आडव ते
झोपवतोच त्याला
ए बेवड्याऽऽऽऽ
चल हड, व्हय तिकड
एऽऽऽ कोन र ते, हाऽऽऽ
भाऊ तुम्ही, सोरी सोरी
एक दहा ईस द्या ना
औषध घेतो थ्वाड
बर न्हाय वाटत
नीघ हल चल
औषध घेतो म्हण
द्या ना ओ पाचच
घेवूदे वाईच घेवूदे

आर बास कर की
थोबाड बघ सडल की
पार पिंजरा झाला की
धड हुब रा आधी
जा घराकड नीघ
नायतर देतो एकच
सोड आता सोडून दे

आल का , या ववाळते
ए गप ए, पैशे दे
पैशे बिशे काय न्हाय
गप पड तिकड
मराया लागल न पीतय
हा हा गप तू चल ए
घेवूदे मला घेवूदे
पडुदे मला पडूदे

मंग पडलो कोपर्‍यात
माझ्याच डफ पाशी
डफावर हात पडला
लय भारी, वाजवूकी
पर पडलो त गप गारच
पडुदे मला पडूदे
झिंगूदे मला झिंगूदे

उतारली वाटत
जरा वाजवतू आता
आयला हात बांधल
मी हाय कुठ हे
सुया बीया, हाय काय
ए कोन हाय का हित
उठूदे मला उठूदे

ओ ओ उठू नका
पडा पडा तसच
उठल का धनी
बर वाटत का ?
वाचला बघा
चार दिस झाल
आता सुद आली
पिताका अजुन
बास आता
सोड बाबा सोडुन दे

म्हंजी तवा जे पडलो
त दवाखान्यातच उठलो !
नमस्कार, मी डॉक्टर
बर वाटत का ?
थोडक्यात निभावल
हो पण आता सावध
सगळ बंद करायच
तंबाखु, बीडी, गुटका
दारु ला तर आता
शिवायच पण नाही
नाहीतर आँपरेशनच
गाल फाडावा लागेल
लिव्हर खराब होतय
तेंव्हा दारु पार बंद
सोड आता सोडून दे

प्यावी वाटली तरी
आवडीच एखाद काम
जस गाण, वाजवण
छंद नाद धरायचा
व्हय व्हय
असच करनार आता
मेरबानी साहेब
आता फक्त
उठूदे मला उठूदे

बास ठरिवल आता
बंद, सगळ सोडायच
पर पहल पहल
लय तरास झाला
हात कापायच
पर डफ उचलला
माझा डफ न मी
अशी किक बसूदे
झिंगूदे मला झिंगूदे

लय दिसान झिंगलो
परत तवा सारखा
भेटल सगळ जुन
ती गानी ती नशा
आता खरी चढली
अस्सल झिंग
अशी किक बसूदे
नाचूदे सगळे डोलूदे
झिंगूदे मला झिंगूदे
....नशेत रसिक(मं)
🙏🙏 4-1-17 🙏🙏

नशीबवान मी
कि अशी प्रेयसी लाभली
ती भरभरून देते
मागत काहीच नाही
तीला बोलवाव, आठवाव
अस काहीच नाही
हवं तेंव्हा, हव तस येते
हलकेच पाठीशी, गळ्याशी
ह्रदयी बिलगते
हात पुढे करायचीही
गरज नाही
तीला कसलेच बंधन नाही
मला लपवायची गरज नाही
तीच्या मूळेच तर ओळख माझी
पसरते ख्याती
ती रोज ऐकवते, दाखवते
एक कहाणी नवी, अनोखी
तीची तीच प्रकटते
लिहीतो त्या शब्दातूनी
मी, माझ अस काहीच नाही
तीचेच सारे, श्रेय ही
.........रसिक प्रेमी, (मं)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा