ब्लॉगकट्टा

Netbhet.com

रविवार, १ मे, २०१६

सैराट - मनोरंजनाच वास्तव

सैराट बघीतला अन सुहास शिरवळकर सरांच्या कोवळीक ची जाग मनास आली, कोवळ्या वयात वाचलेली
हे वयच अस असत कि जे करू ते पूर्ण झोकून देऊन अन प्रामाणीक पणे, प्रेम ही
करायच ते थेट, घडत ही तसच, नसतो फक्त संयम, धैर्य मग नकळत होते ती चुक अन सारेच पोळतात , हाती लागत ते फक्त दु:ख, वास्तव समोर येत ते स्वप्न उधळूनच.
ईथेही असेच स्वैर बिनधास्त पणा पण  आपलीच पोरगी आपल्याच घरच्या बागेत प्रेमाचे चाळे करते, हजारो लोक बाजुला असताना हे कुठल्याच बापाला आवडणार नाही म तो मोठा असो छोट असो कुठल्याही जाती धर्माचा असो, अशी लाज चव्हाट्यावर आलेली कशी खपल, हे कसल वळण म तो कठोर वागला तर चुक काय.
ह्यातून काय प्रबोधन घ्यायच ? अशा प्रेमाचे समर्थन करायच की थोपवायच नेमक हेच स्पष्ट करण्यात दिगर्शक कमी पडतो. वास्तव आणी मनोरंजन ह्याची गल्लत होताना दिसते त्यामुळ हा पहीला भाग तद्दन मसाला प्रेम पट, सिने योगायोग, प्रणय प्रसंग म्हणजे फुल्ल मनोरंजन आणी तसाच बघावा.
दुसरा भाग हा वास्तव वादी म्हणता येऊ शकतो काही प्रसंगी परत फिल्मी योगायोग आहेत
शेवट मात्र खास मंजुळेंचाच पटकथेशी अनपेक्षीत पण वास्तवीक अपेक्षीतच
आता  सामाजीक विषय म्हणाल तर पूर्ण कौटूंबीक विषय घेऊनही मांडता आला असता त्याला अल्पवयीन प्रेम कहाणीची गरज न्हवती
 म्हणून हा एक वास्तवाच्या जवळ जाणारा कमर्शियल मसालापटच जास्त दिसतो
एक वास्तव पूर्ण मान्य करावच लागत ते म्हणजे सर्व कलाकारांच काम अभिनय १०० नंबरी ,
नायीका रिंकू राजगूरू तर अप्रतीमच पहिलाच चित्रपट पण थेट जुन्या अभिनेत्रींची आठवण करून देतो जशा रंजना, उषा चव्हाण , सुलोचना , करारी, बिनधास्त तशाच हळवे भावनीक प्रसंग समान ताकदीने उभ्या करायच्या, अस्सल मराठमोळ रूप, चेहरा हावभाव सौंदर्य लाजवाब.
खुप काळा नंतर बघायला मिळतय अस
र्ईथे मंजुळेंना मुजरा करावाच लागतो जे काम करून घेतल ते जबरदस्तच.
मनोरंजन म्हणून बघायला काहीच हरकत नाही, नाही म्हणायला थोड विचार करायला लावतो, ह्यातून काहीना काही घेतोच आपण
मंगेश मेढी, तळेगाव दाभाडे मावळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा