धमाका
धम्म धमाका फुटला फटाका
धमाल दिवाळी सण आला
बुक्स क्लास होमवर्क संपला
एकदाचा शेवटचा पेपर सुटला
आज सुट्टीचा नारळ फुटला
धम्म धमाका फुटला फटाका
खमंग फराळ चकली चिवडा
लाडू करंजी अनरसा फुगला
मिळून बसुया पाडूया फडशा
धम्म धमाका फुटला फटाका
रॉकेट भुइनळ सुतळी बॉम्ब
गरगर फिरते चक्र जोरात
छोटूची फुलबाजी रंगीत छान
धम्म धमाका फुटला फटाका
जय्यत तयारी जमले मावळे
एक एक दगड बुरुंज तट
बुलंद किल्ला उभा ठाकला
धम्म धमाका फुटला फटाका
.......मंगेश मालती-मधुकर मेढी.
-------------
निज झाडूनी जाग भोवती
धुके न्हाऊनी प्रभात उभीपूर्व आंगणी सडा केशरी
स्वैर पाखरे सजे रांगोळी
शुभ आषीश सौभाग्य किरण
शुभ लाभ शुभता संपदा
आगमन श्री पद प्रवेश
श्री लक्ष्मी पद दर्शनमात्र
नवे पर्व, नवे वर्ष
दीपोत्सव हा तेजोत्सव
नवारंभ नव चैत्यन्य
दिस सुगीचे, समृद्धीचे
मांगल्य शिंपण दारोदारी
हर्ष रंगोली हर अंगणी
लक्ष दीप उजळूनी सभोवती
लक्ष्मी पूजन मनोमनी, घरोघरी
.....मंगेश मेढी.
वंदू मराठी
जन्म मराठी धर्म मराठी
गोड मराठी बोली मराठी
माझी मराठी माय मराठी
वंदू मराठी भाषा मराठी
अक्षर अक्षर आहे स्वर
जैसे नाम तैसा बोल
एकमेव परिपूर्ण सार्थ मराठी
वंदू मराठी भाषा मराठी
सहज सोपी साधी सरळ
घाट घाट घेत वळण
बोली अनेक भाषा एक
वंदू मराठी भाषा मराठी
मावळी पहाडी वराडी अनोखी
अहिराणी पूराणी मालवणी मसाली
कोकणी नाजुकशी रांगडी खानदेशी
वंदू मराठी भाषा मराठी
किती किती कशी कशी
रुपे किती गुण किती
श्रीमंती हीची सांगु किती
वंदू मराठी भाषा मराठी
आली ओढीनी मेक्सीन मावशी
घर दार देश सोडूनी
बोले मराठी झाली मराठी
शाळा तीची आहे मराठी
वंदू मराठी भाषा मराठी
श्र्वास मराठी प्राण मराठी
गर्व मराठी मान मराठी
जगू मराठी बोलू मराठी
वंदू मराठी भाषा मराठी
माझी मराठी माय मराठी
वंदू मराठी भाषा मराठी
...मंगेश मेढी, तळेगांव दाभाडे, मावळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा