ब्लॉगकट्टा

Netbhet.com

मंगळवार, ३ मे, २०१६

----माझे मित्र----

हेच, हेच ते 
दोघ तीघ
सतत,
काही ना काही
टाकतच असतात
काही कामाच
बरचस, बिनकामाच
कधी अचानक, हसवतात
सहजच,
जुने दिवस आठवतात
ह्यांची हुशारी, आवड सगळीच
आंबट, गोड, चावट
एवढ वय झाल
तरी 
किडे जात नाहीत
हे तसेच, तरुण
मस्तीत जगणारे
काही फरक नाही
फरक पडतही नाही
आता, बाकीचे
एकदम शांत
प्रोढ, समजुतदार
कधीच काहीच
न टाकणारे,
अगदी
रिप्लाय ही नाही
खर तर, हे
स्वत:शीच हसतात
रोज न चुकता
पहिले बघतात
आज काय टाकल बघू 
ह्यांनी
आवडत असत
पण सांगत नाही
काही बोलत नाहीत
खर तर, त्याच 
दोघा तीघां मुळे
ग्रुप जिवंत असतो
पुढे चालतो, खळखळतो
आंनदी दिसतो
तेच तेच
माझे साथी
चावट, खोडील, रंगेल
अजूनही जवानच असे
जीवाला जीव देणारे
ते दोघ तीघ
माझे मित्र, माझे मित्र
....रसिक मित्र (मं).....

ना बंधन ना हट्ट
तरीही नात घट्ट
ना अपेक्षा ना रूसवे
ना रूप रंग फसवे
हक्काने द्यावे घ्यावे
हक्क न गाजवता
न मागता बरेच काही
काहीही न मागता
सहजच लुटावे अवघे
नात्यात ह्या
गवसते मोकळीक
ईथेच फक्त
तरीही ओल खोल
मन गाभ्यात
प्रेमात ही शोधतो
म्हणूनच तर मित्र
निर्भेळ हलके फुलके
नात्यात नाते, नाते मैत्रीच
......मंगेश

खरेतर स्वप्न तशीच विरली
पुढे काय आता चिंता उरली
अशातच एक दिवस अचानक
हि भेटली, नवी कोरी
माझ्याच मनी प्रकटली
काव्यांकुर मनी उगवले
नव नर्मीतीचे पेव फुटले

जणु सखी, प्रेयसी भेटली
हात हाती देवून तिने
गोड हसत पाहून म्हणे
चल ना जाऊ सोबत
पुढचा सारा प्रवास
ठाऊक मज एकटा तू
कुठेच, काहीच, कशातच
जमले नाही तुझे
कोणीच नाही तुझे
सोड ना चिंता, काळजी
आले ना मी, आहे आता तुझी
पकड घट्ट करून म्हणे
मी तुझी अन तु माझा
सजव तु मला
तुझ्या शब्दालंकारांनी
भेटेन मी तुज रोज नव्याने
अन अशी बिलगली
जणु अंतरी उतरली
एकरूप, एकजीव
मनी वसली
साथ आयुष्याची सोबती
रसिक मी चाहता झालो
तिच्याच विचारात बुडालो
चालता बोलता, स्वप्नात सत्यात
जगता जगी जग पहाता
तीलाच पाहतो, तीचाच होतो
अन कवितेच्या प्रेमात पडलो.
.....मंगेश मेढी

चालत रहावे वाट पुढे काय ठाव
उतरायचे अन कुठे काय ठाव
वाटले बसावे घडीभर तरी
विसावा मिळे कुठे काय ठाव
हा मार्ग रोजचाच तरी नवा रोज
दिशा कोणती ईथे काय ठाव
धावणे मागे मागे कासावीस जीव
शुभ्रजल हाती पडे काय ठाव
कुठला प्रवास निघालो कशास
भेटले बेट हे कसे काय ठाव
संपला प्रवास मोजकेच श्र्वास
प्रारंभीच असा असे काय ठाव
___ मंगेश मेढी
घे जरा विसावा
जाता जाता थबकुनी थोडासा 
पायाशी तुझ्या वाकुनी जरासा
हलकेच गोंजारुनी नवांकुराला
शिंपुनी तव प्रेमजल-ओलावा
खत मायेचा घास भरावा

सुखावेल तोही हसेल तोही
वृक्ष होऊनी बहरेल तोही
फळ फुलांनी डवरेल असाही
पक्षी पाखरे कवेत झुलतीलही
साद सृष्टी संगीत मैफील ही

खुणावेल काही म्हणेल तोही
कधी दमुन थकुन तुही
जीवन मार्गी खडतर याही
येशील छायेतील नदी काठी

घे जरा विसावा !, जरा विसावा घे, घे विसावा जरा .
___मंगेश मेढी.


कस असत कस कस असत
अस असत का तस असत
प्रेम कस असत, प्रेम कस असत

भूरळ पडावी का
भूलवाव

वेड लागाव का
लावाव

अस असत का तस असत
कस कस असत......

झोप उडावी का
उडवावी

आपण पडाव का
पाडाव

अस असत का तस असत
कस कस असत.....

नजर गुंतावी का
चोरावी

मन हराव का
जिंकाव

कस असत कस कस असत
अस असत का तस असत
प्रेम कस असत, प्रेम कस असत
...,....मंगेश मालती-मधुकर मेढी.
१४ फे. २०१६


हि रंगात येते तेंव्हा हिला
अर्धा कोरा कागद ही चालतो

पण रूसल्या वर मात्र
नवा कोरा सुगंधी ही नको
,..........मंगेश मेढी



    
  • मराठी कविता समूहा वरील उपक्रमात माझा सहभाग !
    काव्यद्विदल - भाग ३ मधील माझा सहभाग
    क्षितीजाचे तट फोडून धावे ! या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कवितेतील विषय/आषय,
    क्षितिज हा शब्द यावर आधरीत प्रेरित प्रयत्न

    प्रथम काव्य दल - आकृतीबंध

    जो तो धावे नित्य निरंतर
    जगण्याची ही शर्यत अविरत
    ना विसावा ऊसंत ना क्षणभर
    दम छटोस्तर ऊर फुटोस्तर
    उंच उंच स्वप्न-मनोरे
    खुणावती इच्छांचे इमले
    धावलो जरी क्षितिजा पुढे
    कोणी ना जाणे अंत कुठे
    -मंगेश मेढी.

    द्वितिय काव्य दल - मुक्तछंद

    क्षितीजा पार
    सैर भैर अस्वस्थ हे मन
    कधी कधी जावू पाहे
    काय शोधू पाहे न जाणे का
    क्षितीजा पार
    विपुल सारे जरी येथे
    तरी न रमते त्या क्षणी
    जरी कल्पना वा आभस
    तीच पोहचे क्षितीजा पार

    दिव्य दृष्टी अंतरी ज्याच्या
    गरुड भरारी सम सामर्थ्य
    रिवाज विपरीत प्रवास संकल्प
    परीघ छेदण्या दृढ निश्चयी
    तोच उतरे विजयी ठरे
    क्षितीजा पार क्षितीजा पार

    बालीश अश्या रुढींचे, त्याच त्या
    प्रचलीत चालीचे, मानगुटी बसल्या रितीचे
    गुलामित धन्यतेचे खाल मानेने चाकरीचे
    एक नव्हे इथे क्षितिजा पार क्षितीजे...

    शिवराय वीर ते, शंभु सेनानी
    नरवीर तानाजी अन बाळाजी
    लोकमान्य करारी, स्वातंत्र्यवीर सागरी
    जिंकले पोचले ते क्षितीजा पार

    सौंदर्य येथेही अन तेथेही
    माया येथे सुख भोग अमाप
    निरव शांतता योग तेथे
    कदाचीत सत् स्वरुप तेथे

    अनंत शोध अनेक स्वप्ने
    ज्याचे त्याचे दृष्टांत वेगळे
    परी एकदा तरी पाहून यावे
    जमलेच तर फिरुनी यावे
    सहजची एकदा त्या
    क्षितीजा पार क्षितीजा पार
    ...मंगेश मेढी

    लिहा ओळीवरून कविता - भाग १०५ मध्ये माझा ही सहभाग !

    तेवढ्याचे एवढे तिनेच केले
    अधिकार तिचा पण बोलणार नाही

    जीवन सारेच देणे तिचेच परी
    देणे दे मजला पण बोलणार नाही

    न मागता पुरवी तीला ठाव सारे
    पुरे का आता पण बोलणार नाही

    तु लाख फसवु लपवु पाही
    ओळखुन गुपीतही पण बोलणार नाही

    जिंकायचे कसे तिनेच शिकविले
    हरुनही ती पण बोलणार नाही

    पोटचा गोळा असलास जरी
    चुकीला क्षमा पण बोलणार नाही

    मुर्त रुप इश्र्वर जगी एक जननी
    कोपुनही शाप वाणी पण बोलणार नाही
    ...मंगेश मेढी

स्वप्नघात
धडकून मी पडले एकीकडे
अंग अंग रक्ताळलेले
त्राण सारे हरवलेले
हाय काळ आला होता
पण वेळ नव्हती आली
कदाचीत रोखून तिलाच
आला होतास तू धावून
विसरुनी दु:ख अवघे
तुज पाहून सुखावले
अन तू सावरले हलकेच
उचलूनी अलगद कवेत
घेवून गेलास समेत
प्रेमलेप बांधूनी जखमांसी
झोपवून मज समीप
म्हणलास एवढेच हसुन
काळजी नको करुस
आहे मी इथेच !
भानावरी येताच दिसे
अलबेल कि सारे
देवा ! स्वप्न कि ते सारे
हाय स्वप्नात का असेना
बरसून तर गेलास ! इश्!!!!!!!
............मंगेश मेढी.


नको सोडू हा पाश रेशमी
नको हा विळखा मखमली
अन नजर आडून मोहाची
रसरसते अधर काश्मीरी

गुरफटते गुंतते झुरते मन
थिजला श्र्वास, थिजली नजर

भुरभुरता कुरळा कृष्ण पदर
लावण्य बहरल्या कांती वरी
विखुरली ढळली, नाजुक वेली
डंख मारण्या जशा नागीणी

घायाळ ह्रदय, मतीही गुंग
थिजले तन, थिजला काळ

......मंगेश

नको सोडूस हा पाश रेशमी
नको नको हा विळखा मखमली
जोडीस लज्जा अस्त्र हुकमी
रसरसते अधर काश्मीरी

गुंतले, गुरफटले मन
थिजले क्षण, थिजला श्वास
------------------------------------------------
             प्रेम 
भांडणात प्रेम असावे
प्रेमात भांडण नको
हट्ट प्रेमाचा असुदे
प्रेमात हट्ट नको


हक्क प्रेमाचा असुदे
प्रेमात हक्क नको
प्रेमळ वाद होवो
प्रेमात वाद नको

वाटा प्रेमाचा रहावा
प्रेमात वाटा नको
प्रेम बंध जुळावे
प्रेमात बंधन नको

खोट असल असुदे
प्रेमात खोट नको
आग प्रेमाची पेटुुदे
प्रेमात दाह नको
..........प्रेमात रसिक(मं.मे)

मावळ माती, आमची मावळ माती
पहाड छाती, चाल घाटाची

शिवबाच्या सैन्याची खेती
रांगड गडी हाती दगड फोडी

मावळा मोती, मुलुख झोडी
मावळ माती, आमची मावळ माती

दरी दरीतूनी ललकारी
हर हर महादेव, हरहर महादेव

जय महाराष्ट्र
....मंगेश मेढी




सुखावले आनंदले किती
अत्तराने मोहीत किती
फुलास काय ठाव
रूप खुलले किती



नव्या वर्षाची, नवी कविता

नवे पर्व, नवा हर्ष
नवा मार्ग, नवे स्वप्न

जीर्ण जुने वस्त्र झडे 
कोवळी हिरवाई फुटे

चोहीकडे रंग बहर
बहरला मन मोहर

अंगणी सुगंधी शिंपण
गुंजते कोकीळ मैफील

मधुर बाळांची चाहूल
बाळसे फांदी फांदी वर

नव क्षणाचा, सृजनाचा
सण सृष्टीचा रंगे

आनंदी हे वर्ष नवे
आनंदी हे वर्ष नवे
....शुभेच्छा
.........मंगेश मेढी, त.दा.मावळ

आनंद तुला
की
तूच आनंद
भेटताच तुला
तो असा उमलतो
........मंगेश

होळी

दररोजच जळतात मने यातनां मधी
सततच पेटलेला आहे क्लेषाग्नी !

द्यावीच लागते आहे आहुती आकांक्षांची
कुठेना कुठे आहेच शिमगा आक्रोशाचा

खचुन पडलीय येथे राख स्वप्नांची
मस्त सारे खेळती धुळवड सत्तेची

कायमच नाडला जातोय सामान्यजन
भ्रष्टाचार, स्वैराचार रंगतोय खादीवर

मर मर राबणारा नेमाने खचतोय
ओरबाडणारा तसाच माजतोय

असा रोजच शिमगा होतोय
मग नव्याने होळी ती काय पेटवायची ?

बस झाल अती होतय
अंत पहीला सोसण्याचा

मिळून सारे सरळ सज्जन
उतरुन टकायाची लाचारी
झुगारुन सारी गुलामी

प्रत्यक मनातील एक एक ठिणगी
आहुती द्यायाची पुंडांची दुराचाराची
शिमगा एकदाच दुर्जनांचा लबाडांचा

पेटवू मशाल एकीची जनशक्तीची
आता होळी क्रांतीची ! आता होळी क्रांतीची !

दररोजच मरतात ईथे झाडे, वने
फोफवतात सिमेंटची निर्जीव जंगले

आटते नदी-नाले, विहीरी
ओसरेना पूर अश्रूंचा कधी

नदी उरली कुठे किती राहीली
तुम्ही आम्ही वळवली सारी गटारे

जिथे तिथे घाण कचरा करूनी
प्रदुषणाचे मांडले नवे उच्चांक

अशी नित्य होते निसर्गाची होळी
मग नव्याने ती काय पेटवायची ?

बस झाल अती होतय
अंत पाहू नये सृष्टीचा

मिळून सारे मानव प्राणी
नेसवू हिरवाई भूमाईस
उधळूया रंग फुलांचे

खणू शोष खड्डे, जिरवू सांडपाणी
कचरा प्रदुषणाची आहुती देवूनी
शिमगा यंदा सफाई-स्वच्छतेचा

कर्तव्य सेवा ज्योती हाती
आता ज्ञान-विज्ञान होळी !
आता पर्यावरण होळी !
...................................मंगेश मेढी


कवि शंकर वैद्यांच्या कविते वरून सुचलेली कविता

प्रणयातुर मधुर पक्षी गुंजन
आर्त साद प्रियेस असावी

साद परत साद मागुनी
आर्त हि तरी एकाकी
कातर स्वरी ह्रदयी रूदन
अन
काक कलह कोलाहल
आर्त पुन्हा याचना असावी
निर्वाणीची साद विरती
काक कोलाहल असुरी

अरेरे, चुकलोच मी
नुसतेच अडाखे बांधीत बसलो
.........मंगेश मेढी

खुश नसिब है जो
ऊन्हे दोस्त मिलते है
वर्ना दुश्मन तो बिन बुलाए मिलते है
बिना वचन दोस्ती लुटाए प्यार
वर्ना प्यार मे हमेशा ही दिल तुटते है
पास हो या दुर दोस्त दोस्त ही रहे
वर्ना आशीक अक्सर गुलाम बनते है
दोस्ती निभाओ तो सजे, वो प्यार हो या शादी
वर्ना रिश्ते तो रोज ही टुटते है
..........मंगेश मेढी

कर्पूरगौर करूणाकर
दयाघन भोलेनाथ
आदिगुरू आदिनाथ
कलाधिश नटराज
नृत्यमयी डमरुधर
वीणानाद संगीतेश्वर
ज्ञानसिद्ध योगीराज
चंद्रशेखर, गिरीराज
महाकाल तांडवस्थ
ध्यानस्थ शिव शंकर
मुक्तीदाता भक्तप्रिय
हर हर महादेव
हर हर महादेव
..........मंगेश मेढी


मैत्री विकत थोडी मिळते
मैत्रीत व्यवहार थोडी असतो
असत ते फक्त लुटणे मुक्त हस्ते
नात मनाच मनाशी जुळत
एक्सपायर तर पथ्य होत
.....मंगेश मेढी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा