ब्लॉगकट्टा

Netbhet.com

रविवार, १ जानेवारी, २०१२

साक्षात्कार !


आज काल बरेचशे स्वत:स सुधारलेले अधुनिक म्हणवून घेणारे, ज्यांना नास्तिक म्हणता येइल असे लोक नेहमी म्हणत असतात
अगदी दावा करतात देव वगैरे काही नाही, परमेश्र्वर नाहीच दाखवा कुठे आहे.
आणी त्यमुळेच आमच्या सारख्या श्रद्धाळू अस्तीक लोकांना विचार पडतो, चिंतन चालू होते परमेश्र्वर म्हणजे नेमके काय ? अस्तित्व आहे का? उत्तर शोधलेच पाहीजे .
तर एकच उत्तर मिळते होय आहे, नि:संशय, निश्चितच, खरे तर स्वर्व विश्र्व, सृष्टी इश्र्वर मयच आहे त्यांनीच भरलेली आहे. कसे ते सविस्तर पाहूच.
इश्र्वर, परमेश्वर ही एक संकल्पना आहे म्हटले तर, खरे तर ते आहे सृष्टीचे, निसर्गाचे, आपल्या सर्वांचे शुध्द अंतीम स्वरुप तत्व.
हे मनुष्याच्या मनातील अहंकार, जीवनातील मद दूर करते आणी फक्त हीच शक्ती हे करु शकते बाकी काही नाही. एकदा का दूर झाला की माणूस यशाच्या शिखरावर पोहोचतो
गरज असते फक्त श्रध्देने शरण जाण्याची, स्वत: विषयी फाजील आत्मविश्वास मद अहंकार विसरुन याचा अर्थ असा नव्हे की स्वाभीमान, बुद्धेमत्ता, हुशारी ज्ञान याला काहीच महत्व नाही,
नक्कीच आहे खुप महत्व आहे पण या हुषारीला, बुद्धीला, ज्ञानाला योग्य दिशा मिळण्यासाठी गुरु कृपेची, शुभेच्छांची, प्रोत्साहनाची गरज असते तरच यश मिळते.
तर ह्या शुभेच्छा, प्रोत्साहन, आशीर्वाद, आधार मिळते कुठून जेंव्हा आपण मी पणा सोडून नम्रपणे गुरुस शरण जातो, गुरु म्हणजे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू..... इश्र्वर हे याच गुरुंच्या रुपाने,
माध्यमाने सर्वांना ज्ञान, आशीर्वाद, यश देत असतात. म्हाणजेच इश्र्वर आहे, सदैव पाठीशी आहे.
तसेच जेंव्हा आपण मी पणा सोडून नम्रपणे, प्रेमाने आपल्या आइ, वडीलांना शरण जातो, भाऊ बहीण, मित्र-मैत्रीण, पती-पत्नी ह्यांच्याशी विश्वासाने आपले मन मोकळे करुन सुसंवाद साधतो
तेंव्हा जो आधार,पठबळ,प्रोत्साहन, आशीर्वाद मिळतो आणी आपण पुन्हा नव्याने उभे राहतो. त्यावेळी त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष परमेश्र्वर आपल्यावर कृपा करत असतो.
म्हाणजेच इश्र्वर आहे, सदैव पाठीशी आहे आणी तेच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करुन दु:ख दूर करतो.
        ह्या बाबतीत चार घटना प्रत्यक्ष माझ्या बाबतीत घडलेल्या त्या उदाहरण दाखल किंवा साक्षात्कार म्हणता येतील अशा 
पहीले असे  की एक दिवस मी बागेत काम करत असता, पाण्याच्या टाकी मध्ये लक्ष गेल तर त्यात एक जिवंत सापसुरळी पडलेली मला दिसली, ती जीव वाचवण्या साठी धडपड करत होती, साधारणत: आपण अशा प्राण्यांची किळस करतो भितो किंवा त्यांना मारतो पण त्या दिवशी काय झाल माहीत नाही पण एक अंतस्थ प्रेरणा झाली की काहीतरी करुन हिला वाचवले पाहीजे.
      मग मी लगेच काही तरी शोधू लागलो जेणेकरुन तीला बाहेर काढता येइल, मी एक नारळाच्या झावळीचा दांडा पडलेला उचलला जो थोडा वर्तुळाकार होता तो पाण्यात अर्धा सोडला जेणे करुन त्यावर चढून तीला टाकीच्या कठड्यावर येता येइल व ती वाचेल आणी थोडा बाजुला गेलो व इश्र्वर   कृपेने हो इश्र्वर कृपेनेच, तीने पण तसेच केले. आणी ती वाचली मग मला जो आनंद मिळाला त्यालाच आत्मानंद म्हणतात हे जाणवले काही तरी खरच चांगल हातून घडल्याचे समाधान मिळाले. हे सर्व एवढे अचानक आणी नैसर्गीक पणे घडले की मलाच जाणवले नाही की मी असे काही केले ते म्हणून पटले, हा इश्र्वराचाच साक्षात्कार त्यांची इच्छा होती म्हणून मी तेथे होतो, ते सर्व केले    नव्हे त्यांनीच करवून घेतले ती वाचावी ही त्यांचीच इच्छा !
दुसरे तर फारच जीवघेणे आणी रोमांचक की अजुनही आठवले तरी सर्वांग रोमांचीत होते आत्ता ही हे लिहीताना. झाले असे की मी आमच्या गच्चीत पाणी घालत होतो नुकतेच वॉटर प्रुफींगचे काम झाले होते, तर अचानक कासली तरी फडफड नारळाच्या झाडाच्या दिशेने ऐकू येत होती म्हणून बघू लागलो तर एक साळूंकी झावळी च्या जाळ्यात अडकलेली आणी बाजुला कावळे टपलेले ते सगळी कडेच असतात अगदी आपल्याही भोवती, तर आता काय करायचे हीला तर सोडवायचे पण कसे मग इकडे तिकडे बघताना नारळ कढायची आमचा आकडा दिसला, व्वा झाल काम उचलला आकडा सावकाश जाळ्यात अडकवला आणी हलकाच एकच हीसका दिला जाळे तुटून ती मुक्त होऊन उडून गेली  आणी मी उड्या मारत होतो गच्चीतल्या पण्यात जणू नामदेव, तुकाराम भजनावर उड्या मारतायेत हे सगळे कसे घडले मी कसे काय केले परत पहील्या वेळे सारखेच तीच अनुभुती तोच साक्षात्कार त्यांचीच लीला.
तिसर्‍या वेळी त्याच गच्चीतल्या पाण्यात विंचवाचे पिलू वळवळत होते अश्या वेळी आपण ते मारुन टाकतो कारण धोका पण बहुतेक परमेश्र्वर परीक्षा घेत होते आणी मी पास झालो का कोणास ठाऊक मी ते एका पानावर उचलले आणी खाली जाऊन बाहेर सोडुन दिले पुन्हा दर्शन पुन्हा तेच सुख इश्र्वराचे प्रेम.
चौथ्यांदा घडले असे भवाची मेहुणी शिकायला आलेली अर्ध्यातच तीचे लग्न झाले मग ती इकडे नवरा तिकडे होता होता एकदाची परीक्षा झाली आणी तो मागे लागला घरी चल पण ही बया हट्टी आधी मी माहेरी काही दिवस राहणार मग येणार झाले भांडण सुरु, आणी अचानक एक दिवस नवरा, सासरा सरळ यऊन धडकले, जबरदस्तीने तीला खेचून नेवू लागले मारु लागले, मी समजावतोय तर उलटे धाऊन येवू लागले मग माझी सटकली दोघांना धक्के देवून हाकलून दिले. वास्तवीक मी काही बलदंड नाही भांडण मारामारी करणाराही नाही तरी पण त्या दिवशी कुठून बळ आले वीरता प्रकट झाली आणी अनर्थ टळला मग तर पूर्ण विश्र्वास, श्रद्धा बसली आणी आनंद की मी कीती भाग्यवान इश्र्वराने माझी निवड केली माझ्या पाठीशी उभे राहीले सारे करवुन घेतले  अशी अगाध लीला हरीची  आता तुम्हीच ठरवा काय ते मला तर समाधान सुख आनंद शक्ती मीळाली की इश्र्वर माझ्या पाठीशी आहे आता कसली भीती कसली चिंता आजवरच्या लंगड्या भक्तीचे एवढे सुंदर फळ तर संपूर्ण भक्तीने काय होइल बस माझी भक्ती दुप्पट होऊ लागली आणी निष्कम श्रद्धा दृढ झाली.
हे झाले तर्क संगत स्पष्टीकरण, साक्षात्कार. आता आपण भौतीक अथवा विज्ञान दृष्टीने बघु
आपण बुद्धीमान, उच्चशिक्षीत, व्यवसायात अथवा निजी क्षेत्रात यशस्वी लोक काय म्हणतो की भौतीक दुष्ट्या प्रत्यक्ष पणे परमेश्र्वर दाखवा कुठे आहे त्यामुळे परमेश्र्वर इश्र्वर असे काही नाही.
बौद्धीक, भौतीक पातळी वर अगदी बरोबर मान्य. पण आपण शांत पणे थोडा वेळ तटस्थ पणे विचार करु की आज आपण यशस्वी आहे, व्यवसायात आपल्या क्षेत्रात, पण हे कसे साधले अर्थातच ज्ञान,
हुशारी, बुद्धीमत्ता,कष्ट,मेहनत यांच्या जोरावर पण अगदी सुरवातीला जेंव्हा आपण कुणीच नव्हतो सुरवात करत होतो, धडपड करत होतो त्या वेळेस ज्ञान कसे मिळवायचे आपल्या बुद्धीमत्तेचा वापर कसा
करायचा कुठला योग्य मार्ग धरायचा हुषारीचा उपयोग कसा करायचा याची प्रेरणा कुठुन मिळाली, कुठुन मिळाली ही उर्जा, ह्याच निसर्गातून, निसर्गातल्या कुठल्या तरी एक किंवा अनेक घटकांतून, घटनेतून
अचानक एक उर्जा, कल्पना, मार्ग मिळतो. हा घटक ती घटना म्हणजेच अव्यक्त असा परमेश्र्वर, ह्या माध्यमातून इश्र्वर आपल्याशी संवाद साधतात, माया करतात.
शेवटी आपण सर्व, सर्व प्रणी मात्र, सजीव-निर्जीव संर्पूण चराचर हे ह्या निसर्गातूनच निर्माण झालेले आहे, त्या आलौकीक नैसर्गीक उर्जेतून, प्रेरणेतून निर्माण झालेले आहे. सुर्य चंद्र पृथ्वी सर्व ग्रह तारे
ह्याच उर्जेतून निर्माण झालेले आहेत व सर्व अंतत: तेथेच विलीन होते. ही उत्पत्तीम स्थिरता, लय प्रक्रिया सतत चालु आहे. म्हणजेच ही उर्जा, प्रेरणा हा संपूर्ण निसर्गच परमेश्र्वर आहे किंवा आपल्या ज्ञानी अभ्यासु ऋषी
मुनींनी अभ्यासा (तप) अंती ह्या उर्जेस स्थितीस, स्वरुपास ज्याला ज्योती (आत्म) स्वरुप असेही म्हणतात त्यास परमेश्र्वर, इश्वर असे नाव दिले जेणे करुन आपल्यला सोपे जावे एकाग्र होता यावे. आणी आपले मूळ स्वरुप ही तसेच ज्याला आत्म स्वरुप म्हणतात असेच आहे.
आता जर ह्या शक्तीस, उर्जेस हे सर्व निर्माण करता येते, पालन करता येते, सजीवांन कडून नाना विविध कर्म करवून घेता येतात त्या शक्तीस एखादे सजीव रुप धारण करणे, ज्याला अवतार म्हणू शकु किंवा मुर्त स्वरुप, सगुण स्वरुप म्हणता येइल, अवतार म्हणजे संपूर्ण नैसर्गीक शक्ती,सामर्थ्य कला-गुण युक्त सजीव घटक असा धारण करता येवू नये ? नक्कीच येते.
परमेश्र्वर प्रत्यक्ष दिसण्या पेक्षा ती एका जाणीव आहे जसे सुगंध जाणवतो पण दिसत नाही, गारवा जाणवतो दिसत नाही तसेच.
गरज असते फक्त विश्वास, श्रद्धा बाळगण्याची आणी मन:चक्षुने इश्र्वर पहाण्याची मग सगळ्याच नैसर्गीक घटकांमध्ये आपणास परमेश्र्वराचे अस्तीत्व जाणवते आणी प्रत्यक्ष परमेश्र्वरांनी पण हेच सांगीतले आहे
कणा कणात मी सामावलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा