कृतज्ञता
धावता धावता थांबून आज
जीवन प्रवास वळवून खास
छाये खाली झुकलोय आज
हात जोडून काही सांगायास
आभार व्यक्त करावयास,
आहात तुम्ही म्हणून आम्ही
तुम्हा कारणे जगणे हे
श्र्वास देता उच्छवास घेऊन
समर्पित निस्वार्थ जन्मोद्देश
इश्र्वर सेवक खरे तुम्ही जगती
परी जाणतो ना आम्ही
जाणीव ना कधीही
सजीव तुम्हीही आम्हा समान
साभार अश्रू वाहतो मुळाशी
प्रेमालिंगन देऊन बुंध्याशी
शरण तुम्हासी क्षमा करावी
हे वृक्ष मित्रा करुणावतारु
स्वीकार व्हावी भेट मैत्रीची
स्वीकार व्हावी भेट मैत्रीची.
.....मंगेश मेढी., ७ एप्रिल २०१४
------------------------
क्षण
धावता धावता थांबून आज
जीवन प्रवास वळवून खास
छाये खाली झुकलोय आज
हात जोडून काही सांगायास
आभार व्यक्त करावयास,
आहात तुम्ही म्हणून आम्ही
तुम्हा कारणे जगणे हे
श्र्वास देता उच्छवास घेऊन
समर्पित निस्वार्थ जन्मोद्देश
इश्र्वर सेवक खरे तुम्ही जगती
परी जाणतो ना आम्ही
जाणीव ना कधीही
सजीव तुम्हीही आम्हा समान
साभार अश्रू वाहतो मुळाशी
प्रेमालिंगन देऊन बुंध्याशी
शरण तुम्हासी क्षमा करावी
हे वृक्ष मित्रा करुणावतारु
स्वीकार व्हावी भेट मैत्रीची
स्वीकार व्हावी भेट मैत्रीची.
.....मंगेश मेढी., ७ एप्रिल २०१४
------------------------
क्षण
हर एक क्षण जर नवा इथे
जन्म नवा हर एक क्षणी
मग कशास हवी मोजदात
अन कशास मांडावा हिशेब
कशास सल विरत्या क्षणांचे
अन हळवे बंध गत-क्षणांचे
कशास मोह येत्या क्षणांचा
क्षणा क्षणातल्या मृगजळाचा
क्षण एक जरी जगलो कलंदर
क्षण आणिक हवे कशास.
------------------------
गाइ गाइ
गाइ गाइ कलु चला गाइ गाइ कलु
श्वपनात जाऊ चला श्वपनात जाऊ
बाप्पाला भेतू चला बाप्पाशी बोलु
गाइ गाइ कलु.......
झोपत हशु चला हशत बोलु
ढगात शिलु चला ढगावल बशु
धलाम धलुम घंता छालेत जाऊ
गाइ गाइ कलु.......
ढगाच्या शालेत मऊ मऊ खुलची
गोद गोद पली मिस चंदेली पंकाची
पली बाइंना भेतू चला पोम मनु
गाइ गाइ कलु.......
चमचम छली तीची दादु बगु
निला निला फला, लुकलुक स्तोली
गोत्तीची गंमत जंमत ऐकू
गाइ गाइ कलु.......
दादुच्या पातीवल चितल कालु
माजीक पेशीलने एबीशीली लिहु
हवेत ऊलु चला लथात बशु
गाइ गाइ कलु चला गाइ गाइ कलु
गाइ गाइ कलु चला गाइ गाइ कलु
गाइ गाइ कलु चला...........७ मार्च २०१४.
--------------------------------------
हा एक प्रत्यक्ष घडलेला प्रसंग,
एक संवाद नजरेचा नजरेशी,
भाव भावनांचा न बोलताही
शब्दात वर्णन करण्याचा प्रयत्न
मुक्तछंद
हसत हसत निरोप
भेटायचे नव्हते मनात आज पण
बोलावले तू लिंबू पाणी हवे म्हणून
आलो हा तसाच उसने हास्य खुलवून
पाहता ती व्याकूळ नजर तुझी खोल
जाणले तत्क्षणी हे कारण मात्र
अखेरची भेट हवी तुला खरेतर
डोळे भरुन निरोप घेतेस हसुन
अन ! मीही देत आहे तसाच हसुन
देतो वचनही तुला नजरेतूनच
राहीन सुखात सावरीन स्वत:स
नाही शोक करणार ना मी थिजणार
करु नकोस काळजी ना चिंता आता
सांभाळीन मी मलाच, राहीन उभा
ना हरणार मी ना मोडणार मी
असेन सदैव आनंदी, मजेत असाच
होत राहीन मोठा जसा हवा तुला
जीव अडकला माझ्यात, ठाऊक मला
सोड माया आता केलीस अमाप
जा, जा तु जा आइ ! मुक्ती मार्ग तुझा
सद्-गतीचा होवो प्रवास पुढचा.
५ मार्च २०१४, ९८८१४९०१४७
-------------------------
जगण
जगणे चार-आठ दिसांचे
दिस दोन ते चालायला
तर दोन ते शिकायला
उरले किती ते जगायला
घलावी ते ही भांडायला ?
कणा कणात प्रेम फुलते
चौकडे सौंदर्य उमलते
पुरेल कसे बघायला
मग खर्चावे का रडायला
जीवन नाट्य बढीया
हर क्षण हर घडी वगाचा
रंगवू कलंदर भूमिका
झोकात प्रवेश करुया
---------------------------
छंद तुझा माझा
ठेवा आनंदाचा
साथ कलेची
काव्याची नशा
नाद चित्रांचा.
जाता जाता कुठे
फुललले रस्ते
मोहक ते वळण
नदीचा तो ओघळ
डोंगर कपारी
घनदाट वनराइ
डोकावती मधून
प्रकाश किरण
प्रभात रुप
उधळते सांज रंग
बोलके ते डोळे
निखळ ते हास्य
ओघळती कुणाचे
अश्रु करुण
भाव भावनांचे
घुसळते मंथन
एक ना अनेक
जीवन नाट्य
टिपते मन
अन छायाचित्र
छंद तुझा माझा
ठेवा आनंदाचा
-----------------------------------
सखी
कविताच आता माझी सखी
तिने साद द्यावी अन मी न लिहावे
एवढा निष्ठूर होऊ कसा
मी लाख टाळेन, विसरेनही
पण ती मज सोडेल कशी
नशा अशी अन प्रित ही
कि हरवून मज वाहीन मी
ही घट्ट मीठी हा बंध रेशमी
प्रेमात मी, धुंदीत मी
क्षणोक्षणी नवा जन्मतो मी
सहवास हा सुखाहुनी सुखी
खुलविले तिनेच सौंदर्य जगी
फुललेली, सजलेली वाट ही
अन उमटते लावण्य नभी
आनंद रोमांच ठायीठयी
तिनेच तर जागविले माझ्या मनी
भेटतो आज दिसतो तुम्हास
उद्यास कदाचीत गवसणार नाही
गुंततो, फसलो, भुललो तीला मी
माझा न मी उरलो जराही
दोष न द्यावा, राग नसावा
तिच्या समेत, तिच्या मध्येच
केंव्हातरी हलकेच असेनही मी.
________मंगेश मेढी. २६/११/२०१३, ९८८१४९०१४७
भेट मैत्रीची
अवचीतशी जरी भेट आपली
वाटते परी का हळवी अशी
नजरेतूनी दिसे साद सौख्याची
सांग म्हणे काय सलते मनी
मन मोकळे होइ तुज पाशी
बोलते ते नकळत माझ्याही
एकते तुही कसे साथ देऊनी
तू काय इथे अशी खुण पाहीली
गुंता मनीचा हा सोडवूनी
देतेस दिलासा हात धरुनी
घडते का कधी हे असेही
जुळेते मैत्री हलकेच कुणाशी
गुंतते मन कि ओढ लागुनी
गेले ते गेले वेड लावुनी
भिरभिरते ते पाखरा परी
भेटीत दिलिस मज भेट मैत्रीची.
अवचीतशी जरी भेट आपली
वाटते परी का हळवी अशी
......मंगेश मालती-मधुकर मेढी.
शुभ दिपावली
हर्ष विजयाचा सण विजयाचा
असत्यावरी सत्याचा
अधर्मावरी धर्माचा
असुरांवरी प्रभु पुरुषोत्तमाचा
तव सर्वांसी तव सर्वांसी
शुभ दिपावली शुभ दिपावली
सुदीन हे सौख्य भरे
स्वास्थ भरे संपन्न से
जननी जानकी माता
निज गृहे आगमन हे आगमन हे
तव सर्वांसी तव सर्वांसी
शुभ दिपावली शुभ दिपावली
तिमीर छेदती तेजो तिर
मोह जाळती आत्म ज्योती
ज्योती ज्योती तेवूनीया
स्वागत करुया स्वागत करुया
तव सर्वांसी तव सर्वांसी
शुभ दिपावली शुभ दिपावली
मंगल प्रहरी स्मरण करता
सोडवी श्रीहरी नरकवास
सुटले बंध संपल्या यातना
लाभले सुख सौभाग्य धन
तव सर्वांसी तव सर्वांसी
शुभ दिपावली शुभ दिपावली
लेप प्रितीचा अभ्यंग अर्पूनी
न्हाऊ घालुनी सजविते
भाग्य ज्योती घेऊन करी
पूजीते लक्ष्मी नारायणा
तव सर्वांसी तव सर्वांसी
शुभ दिपावली शुभ दिपावली
सरले साल सरल्या प्रतीक्षा
आनंदास उधाण येइ
भेटीस जेंव्हा भाऊ जाइ
ओवाळीते ती प्रेमभरे प्रेमभरे
तव सर्वांसी तव सर्वांसी
शुभ दिपावली शुभ दिपावली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा