ब्लॉगकट्टा

Netbhet.com

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०११

पाटी नाही फुटली

शाळा सुटली ! मी धुम ठोकली !
पळता पळता धडक झाली
हातची पाटी उडून पडली
अरेच्चा हे काय फुटलीच नाही
पण ते तर म्हणतात

शाळा सुटली पाटी फुटली
शाळा सुटली पाटी फुटली

सांग ना आइ काय जादू झाली
पाटी माझी फुटलीच नाही
           अरे बाळा पाटी आता हुशार झाली
अशी तशी फुटतच नाही
सोडून तुला जाणार नाही
     पहिल्या सारखी जड नाही
अरे व्वा ! ही तर माझ्या सारखीच
धमाल धूडगूस मज्जा मस्ती
मी तर आता भिणारच नाही
   सुटली रे सुटली शाळा सुटली
पाटी नाही फुटली पाटी नाही फुटली !
मंगेश....!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा