मद अहंकार जाळले
इश्वर कृपे बीज रुजविले
गुरुकृपे खतपाणी मिळाले
साधनेचे रोप बहरले
ज्ञान कलेने डवरले
फळ यशाचे चाखीले
मन समाधाने सुखावले
भगवत भक्ति मधे गुंतले
मोक्ष प्राप्तीचे द्वार उघडले.
--------------
आहोत का आपण खरे स्वतंत्र,
करावी का स्वतंत्रता साजरी ?
धर्म जातीच्या राजकीय खेळी
माणसा माणसात फुट पाडी
परकीयांचीच ही तर नीती
अभीमाने पुढे नेती
आहोत का आपण खरे स्वतंत्र ?
भ्रष्टाचार आणी स्वार्थाची
मिटलीय कुठे गुलामी
सवलती आणी आरक्षण
घडवतात रोज नवे अपंग
आहोत का आपण खरे स्वतंत्र ?
सत्तेच्या या स्पर्धेपायी
लोकशाहीची व्याख्याच बदलली
आहे का कुठे राष्ट्रप्रेम ?
दिसते फक्त खुर्ची, पक्ष प्रेम
आहोत का आपण खरे स्वतंत्र,
करावी का स्वतंत्रता साजरी ?
संकल्प !
साधुया का नवा बदल
करुया का थोडे परिवर्तन
करुया का पैशाचे जगातून उच्चाटन
कधी काळी होता ओलावा माणुसकीचा
मानत होतो देवा परी अतिथीला
काय कस बर हाय का ?
या बसा गुळ पाणी घ्या
अन आता काय र बा हिकड कसा
काय काम काढल ? तुझ की माझ ?
करुया का पैशाचे जगातून उच्चाटन
देवा साठी होता गाठीचा पैसा
तोच होऊन बसला देव आजचा
त्याच्या पुढ झुकती भले थोरले
कालचा सोम्या रात्रीत राव !
त्या मागे धावती छटूस्तोवर दम
हाती लागला तर उठतो कोण ?
करुया का पैशाचे जगातून उच्चाटन
जर कधी अस झाल तर !
होतील का सारे नि:श्चिंत ?
नैसर्गीक जगण्यातला साधेल का आनंद ?
आपणच बनवीला आपल्याच करीता
हरवून बसलो स्वत:स ही त्याच्या करीता
करुया का पैशाचे जगातून उच्चाटन
समजेना मनास या, प्रश्न अनुत्तरीत हा !
पैसा माणसासाठी का ?
माणूस पैशासाठी, माणूस पैशासाठी ?
साधुया का नवा बदल
करुया का थोडे परिवर्तन
करुया का पैशाचे जगातून उच्चाटन... मंगेश मेढी. ८/०२/२०१२.
पहिला थेंब पहिला तो शहारा
विरहा नतर स्पर्श पहिला
प्रेम भेट गगन वर्षा
गंधांचीत ही तप्त काया
हिरवांकुरित रोम रोम
जन्म नवा कणकणातुनी
पाझरतो ममतेचा पान्हा
कवटाळे मज उरी सुखाने
कुशीत मायेने कुरवाळे
हिरवाईने नटते फुलते
भोळी आशा उमेद तीची
जपेन फुलवेन तीला असेच ?
मन आईचेच शेवटी !
..........................मंगेश मेढी
बघ आत, तुझ्यातच
भेटेल तो तिथेच
प्रेम मायेने नजरेचे पुल बांधून
सांधेल तो नाती माणसाची
गोड स्मित, लाघवी वाणीने
हसतमुखाने, थोपवील अश्रुही
निर्मळ, निस्वार्थी तूच तुझा
अभेद्य ती साथ करेल
विश्वासाचे छत पाघंरूनी
संशयाचे भूत पळवेल
ईंजीनीयर तो तूच तुझा
फुका शोधीसी रानोमाळ
..,........मंगेश मेढी
संकल्प !
साधुया का नवा बदल
करुया का थोडे परिवर्तन
करुया का पैशाचे जगातून उच्चाटन
कधी काळी होता ओलावा माणुसकीचा
मानत होतो देवा परी अतिथीला
काय कस बर हाय का ?
या बसा गुळ पाणी घ्या
अन आता काय र बा हिकड कसा
काय काम काढल ? तुझ की माझ ?
करुया का पैशाचे जगातून उच्चाटन
देवा साठी होता गाठीचा पैसा
तोच होऊन बसला देव आजचा
त्याच्या पुढ झुकती भले थोरले
कालचा सोम्या रात्रीत राव !
त्या मागे धावती छटूस्तोवर दम
हाती लागला तर उठतो कोण ?
करुया का पैशाचे जगातून उच्चाटन
जर कधी अस झाल तर !
होतील का सारे नि:श्चिंत ?
नैसर्गीक जगण्यातला साधेल का आनंद ?
आपणच बनवीला आपल्याच करीता
हरवून बसलो स्वत:स ही त्याच्या करीता
करुया का पैशाचे जगातून उच्चाटन
समजेना मनास या, प्रश्न अनुत्तरीत हा !
पैसा माणसासाठी का ?
माणूस पैशासाठी, माणूस पैशासाठी ?
साधुया का नवा बदल
करुया का थोडे परिवर्तन
करुया का पैशाचे जगातून उच्चाटन... मंगेश मेढी. ८/०२/२०१२.
पहिला थेंब पहिला तो शहारा
विरहा नतर स्पर्श पहिला
प्रेम भेट गगन वर्षा
गंधांचीत ही तप्त काया
हिरवांकुरित रोम रोम
जन्म नवा कणकणातुनी
पाझरतो ममतेचा पान्हा
कवटाळे मज उरी सुखाने
कुशीत मायेने कुरवाळे
हिरवाईने नटते फुलते
भोळी आशा उमेद तीची
जपेन फुलवेन तीला असेच ?
मन आईचेच शेवटी !
..........................मंगेश मेढी
बघ आत, तुझ्यातच
भेटेल तो तिथेच
प्रेम मायेने नजरेचे पुल बांधून
सांधेल तो नाती माणसाची
गोड स्मित, लाघवी वाणीने
हसतमुखाने, थोपवील अश्रुही
निर्मळ, निस्वार्थी तूच तुझा
अभेद्य ती साथ करेल
विश्वासाचे छत पाघंरूनी
संशयाचे भूत पळवेल
ईंजीनीयर तो तूच तुझा
फुका शोधीसी रानोमाळ
..,........मंगेश मेढी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा