ब्लॉगकट्टा

Netbhet.com

शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१२

हे वरद विनायका, विनायका


॥ श्री वरद विनायक प्रसन्न ॥
। तुमच्याच ठायी, तुमच्याच ठायी ।
। मज राम प्रभु मज राम प्रभु ।
। मज गोविंद हरि गोविंद ।
। बालाजी हरि गोविंद ।
। मज पांडूरंग हरि विठ्ठल ।
॥ हे वरद विनायका, विनायका ॥

। तुमच्याच ठायी, तुमच्याच ठायी ।
। मज लक्ष्मी आइ भवानी ।
। मज शारदा माता रेणूका आइ यमाइ ।
। मज सप्तश्रृंगी आइ चतु:श्रृंगी ।
। मज शक्तीपीठे साडेतीन सारी ।
॥ हे वरद विनायका, विनायका ॥

। तुमच्याच ठायी, तुमच्याच ठायी ।
। मज शिव शंकर, भोलेनाथ ।
। मज केदार मज रामेश्र्वर ।
। मज विश्वेश्वर मज सोमनाथ ।
। मज आत्मलिंग अमरनाथ ।
। मज ज्योतिर्लिंग द्वादश सारी ।
॥ हे वरद विनायका, विनायका ॥

। तुमच्याच ठायी, तुमच्याच ठायी ।
। मज श्री गुरु, दत्त गुरु ।
। स्वामी समर्थ, गुरु गजानन ।
। मज समर्थ नवनाथ मज ।
। मज तीर्थ स्थाने, समाधी घाट सारे ।
॥ हे वरद विनायका, विनायका ॥

। तुमच्याच ठायी, तुमच्याच ठायी ।
। मज परब्रह्म साक्षात मज ।
। मज सरस्वती रुप सुंदर ।
। मज मुक्तीधाम वैकूंठ अवघे ।
। मज निज धाम, परम धाम मज ।
॥ हे वरद विनायका, विनायका ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा