ब्लॉगकट्टा

Netbhet.com

गुरुवार, २ जून, २०११

शिव आज्ञा


हे हिंदवी स्वराज्य व्हावे : ही श्रींची ईच्छा
त्या करिताच योजीला हा कर्म यज्ञ
त्या करिताच वाहीली ही जीवन आहुती
सत्ते करिता नव्हता डाव नव्हती ऎश्वर्याची भुक
होता फ़क्त कळवळा रयतेचा धर्माचा
सत्ता केलीच असेल तर केली मनामनातुनी
होते परतंत्र्याचे जोखड सदैव शत्रुंचा घाला
भेदुन तरीही चक्रव्युह शत्रुंना साऱ्या संपवुन
साकारले स्वराज्य 
बलिदान मागीले धर्माने समर्पण केले देहाचे
राखीले धर्मास स्वराज्यास
नकोत नुसते मुजरे फ़ुकाचे जय जय कार
स्मरण करायचेच असेल तर करावे शिवनितीचे
पालन करावे त्या तत्वाचे,शिस्तीचे,कर्म मार्गाचे
हवे आहे आम्हास वचन 
वारसा जपण्याचे
आहे का कुणी मर्द मावळा
शपथ घेणारा धर्माची
स्वराज्य सेवेची,रक्षणाची
तुम्हास भय ना शत्रुंचे
ना बंधन पारतंत्र्याचे
तरीही तुम्ही पराजीत,लाचारसे
शत्रु तुम्ही तुमचेच
शुल्लक स्वार्थापायी
पोकळ प्रतिष्ठेपासाठी
घटना लोकशाहीची 
आम्ही साक्षात घडवली
समानतेच्या तराजुतुनी
मने सारी तोलली
लोकराज्य स्थापुनी भिंती जातीच्या पाडील्या
पराकाष्ठेने उभारले कोण तुम्ही मोडणारे
खबरदार होताय स्वार 
याद राखावे नित्य तख्त हे स्वराज्याचे
जबाबदारीचे,लोकरक्षणाचे 
नाही सत्ताकरणाचे,कदापी नाही उपभोगाचे
सत्ता करावयाची तर हिंमत असावी संरक्षणाची
बळ असावे मनगटी परशत्रु मिटवीण्याचे
जोखुन पहावी लायकी स्वतःच्या नीती मत्तेची
समजुनये मद मस्ततेने राजे आता गेले 
येवु आम्ही परत मातीतुन याच
पहात आहो सारे,सामना होता क्षणी
होतील कलम हात-पाय
रयतेचे हाल असेच,पाहवणार नाही आम्हास
तुम्हास सारे अनुकूल मिळाले आयतेच.
राखायचेच उरले आहे काम काय ते फ़क्त
चैतन्य रुपी स्मारक जागवावे आचरणात
होऊदेत पुन्हा पुकार गर्जुदेत ललकार
हर हर महादेव हर हर महादेव
हर हर महादेव हर हर महादेव
हे हिंदवी स्वराज्य राखावे
ही आमची ईच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा