ब्लॉगकट्टा

Netbhet.com

रविवार, २३ जानेवारी, २०११

विरहा नंतर......








विरहा नंतर
मी म्हणतो मी कविता करतो
कला घडवतो नव निर्मीती घडवतो
पण ती म्हणते मी तेथेच घडते
अवतरते जो कविता जगतो कला जगतो
माझ्याच नादात रमतो
जशी प्रकटते तशीच घडवतो
मी ला ती ची गंमत वाटे
मी जेंव्हा मी म्हणतो
तेंव्हा मी फ़क्त मी लाच पाहतो
मी मी चेच गोडवे गातो
मी मी च्याच धुंदीत रमतो
ती ला विसरतो गमावतो
मग हा मी एकटा उरतो
विरहात मी भ्रमीत होतो
रिक्त होऊनी व्याकुळतेने
मी ला ती ची आठवण येते
साद घालतो शोधु लागतो
सभोवताली सर्वांमधे
स्वत:मधे मना मधे
हलके हलके खुणावते
दिसु लागते
जस जसे मी हरवतो
विरुन जातो
तस तसे ती अवतरते
विसरुन मी चे उदारतेने
प्रेम भरे आलिंगन ते
क्षणात मी ला सावरते
तीच ती भरुन उरते
सुंदरतेने नटते
लेउन अलंकार सारे
लावण्य सखी उतरते
प्रणयाने बहरते
सुखाऊन मोहरते
नव निर्मीतीचे अस्सल
समाधन उमटते
मी मग हा
तीज मध्ये बुडतो
सुखावतो
जीव घेण्या दाहकश्या
विरहा नंतर विरहा नंतर....






मी कविता
पवित्र सात्विक ओवी मी
आत्मानंदी असा अभंग
भक्तीची आर्त-साद
माऊलींची ज्ञान गंगा
जात्यावर जनीच्या सांडले मी
नाचले नाथा संगे
तुकोबाची झाले गाथा
भारुडी मी रंगले
मळ्यातील माईची लेक मी
अन मायेची शीकवण
अदृष्यशी घुसमट
अन अश्रृंना मोकळी वाट मी
उस्फ़ुर्त ह्रुदयीची स्पंदने मी
भग्न मनाची व्यथा
प्रणयी बेधुंद आवेग
भाव भाबड्या लोचनीचे
बागडते आंगा खांद्यावर माझ्याच
बाल मन निरागस
सळसळत्या रक्ताचे कवन मी
रुप शॊर्याचे बलीदानाचे
प्रेम ही माझ्या प्रेमात पडते
माझ्याच सवे मोहरते
योगेश्वरास ही मी भावले
धर्म युद्धी मज गायीले
होय तीच तीच ती
मी कविता मी कविता.

                                                            मंगेश मेढी





तो कलंदर

गवसले वळणावर नेमीच्या
अनमोल से रत्न एक
जमले अनेक वेचून एक एक
मिरवतो कोणी हातातूनी
घडविती अलंकार काही
मांडीले प्रदर्शने काहींनी
तर समारंभे कोणी
दिपूनी गेल्या नजरा सार्‍या
वैभवे लाभल्या अवचीत या !


जो तो विचारी ज्याला त्याला
कोणी सांडीले हे धन कोणाचे ?
नजरेतूनी एकची भाव
उत्तर मनात एकची प्रत्यक !
येथेच होता तो कलंदर
हसणे उधळीत हास्य खुलवीत
ओंजळ भरुनी मोती लुटीत
काय अमाप असे ते वैभव
काव्याचे हिरवे पाचू
कलेचे मोहक माणीक अस्सल
अन प्रतीभेचे लखलखते हिरे
लेवून सारे मिरवत होता
परी दिसले ना कोणा ना पाहीले कोणी
ऐकावेसे बघावेसे कधी कोणास वाटलेच नाही
खंत ना त्याला ना फिकीर कसली
बैरागी तो कला योगी थांबला ना अडखळला
तसाच सांडत गेला पुढे
एक एक वळणा वळणावर
झोळीतील रत्ने अनमोल


हळहळती हूरहूरती पस्तावूनी आता
काय हे नशीब अन प्रारब्ध कसे
नसताना आठवण त्याची
कौतूक करती, गौरव करती
समारंभ काय अन गुणगान ते
कला विष्कार घेवून नाचती
पुजा मांडूनी वंद्य मानती उराशी कवटाळूनी


त्याच्या साठी नव्हे स्वत: साठीच
तेवढेच प्रायश्र्चीत्त मानती


अन तो असाच पुढल्या देशी
कलंदरीने दिलदारीने
संपत्ती आपली वाटत हिंडती
हेसून फक्त एवढेच म्हणतो
तुम्हा करीताच तर हे सारे
आनंदात तुमच्या मी आनंदी


येथेच होता तो एक कलंदर !...
मंगेश मेढी   06/02/2012
------------


पवित्र जल हे...
व्यापुनी ही धरा अवघी तरीही तु धरती वरी


वाहते सरिता जणु पान्हावली भू माऊली
शमविण्यास क्षुधा तृष्णा प्राणीजनां साठी


का अश्रु धारा तीच्या करंट्या लेकरांन मुळी
असेल काही जरी तरी तु अमृता परी 


पद्मीनी जिवनदायीनी

अर्पीत अभिषेक इश्र्वरा प्रती

सर होऊनी पावसाची प्रेम जणु बरसते
प्रणयी प्रकृती मोहरते,बहरते सजते
लेकरास वात्सल्य चिंब करुनी जाते


सागरी गहिर्‍या अथांग जणु ध्यान मग्न शिव तु
भंगता समाधी तीच रुद्र तोच तांडवस्थ


नाचती धावती लाट किनार्‍या कडे
थिरकती अवखळ यौवना कुणी


संन्यस्थ योगी कुणी शांत श्या जलाशयी
का कलेत धुंद कला योगी कुणी


रुप तुझे अनंत सर्व व्यापी


थेंब थेंब अश्रु नयना नयानांमधी
थेंब थेंब ओघळता पाना पानांवरी


पसरती लाली गुलाबी लाजुनी प्रियेसी जशी
नितळ निळायी ही आकाश अलिंगनी


व्यर्थ तुझ विण सारे जीवन अस्तीत्व न ऊरे
जल निर्मळ खरे जल सत्य सुंदर पवित्र जल हे...
-------------



एकांत...
किती सुखी शांत होतो मी आत्मसुखात
निरव स्तब्ध ध्यानस्थ स्वस्वरुपात !
ना ओढ कसली ना आसक्ती
कधी मोह नव्हता भय ना क्षयाचे !
संग्रही असे होतेच काय ?


अन तू प्रकटली....
अन तू प्रकटली प्रभात म्हणूनी
भंगली समाधी दृष्टी दिपूनी
तव दिव्य तजो प्रवेशाने


गुंतत गेलो तव रति-पाशात
विरुनी गेलो तव अस्तीत्वात
लुप्त अस्तीत्व तजो बल सत्व


परी तू चंचल स्वछंदी
प्रवाही लहरी मुळची
मावळता तू संधीकाली


तिमीर मात्र शेवटी ऊरलो
गुढ भयंकर भासते सारे
भय मज आता स्व स्वरुपाचे
काळोख कबहिन्न परिचीत झालो
शोक अतृप्त अदृष्य अंतरी


तव दोष ना कसला
मज भूल मी भूललो
सर्वस्व हरवूनी अंती
झाहलो हा शाप एकांत..शाप एकांत
---------------

क्षितीजा पार

सैर भैर अस्वस्थ हे मन
कधी कधी जावू पाहे
काय शोधू पाहे न जाणे का
क्षितीजा पार
विपुल सारे जरी येथे
तरी न रमते त्या क्षणी
जरी कल्पना वा आभस
तीच पोहचे क्षितीजा पार


दिव्य दृष्टी अंतरी ज्याच्या
गरुड भरारी सम सामर्थ्य
रिवाज विपरीत प्रवास संकल्प
परीघ छेदण्या दृढ निश्चयी
तोच उतरे विजयी ठरे
क्षितीजा पार क्षितीजा पार


बालीश अश्या रुढींचे, त्याच त्या
प्रचलीत चालीचे, मानगुटी बसल्या रितीचे
गुलामीत धन्यतेचे खाल मानेने चाकरीचे
एक नव्हे इथे क्षितीजा पार क्षितीजे...


शिवराय वीर ते, शंभु सेनानी
नरवीर तानाजी अन बाळाजी
लोकमान्य करारी, स्वातंत्र्यवीर सागरी
जिंकले पोचले ते क्षितीजा पार


सौंदर्य येथेही अन तेथेही
माया येथे सुख भोग अमाप
निरव शांतता योग तेथे
कदाचीत सत् स्वरुप तेथे


अनंत शोध अनेक स्वप्ने
ज्याचे त्याचे दृष्टांत वेगळे
परी एकदा तरी पाहून यावे
जमलेच तर फिरुनी यावे
सहजची एकदा त्या
क्षितीजा पार क्षितीजा पार...
-----------


होळी

दररोजच जळतात मने यातनां मधी
सततच पेटलेला आहे क्लेषाग्नी !


द्यावीच लागते आहे आहुती आकांक्षांची
कुठेना कुठे आहेच शिमगा आक्रोशाचा


खचुन पडलीय येथे राख स्वप्नांची
मस्त सारे खेळती धुळवड सत्तेची


कायमच नाडला जातोय सामान्यजन
भ्रष्टाचार, स्वैराचार रंगतोय खादीवर


मर मर राबणारा नेमाने खचतोय
ओरबाडणारा तसाच माजतोय


असा रोजच शिमगा होतोय
मग नव्याने होळी ती काय पेटवायची ?


बस झाल अती होतय
अंत पहीला सोसण्याचा


मिळून सारे सरळ सज्जन
उतरुन टकायाची लाचारी
झुगारुन सारी गुलामी


प्रत्यक मनातील एक एक ठिणगी
आहुती द्यायाची पुंडांची दुराचाराची
शिमगा एकदाच दुर्जनांचा लबाडांचा


पेटवू मशाल एकीची जनशक्तीची
आता होळी क्रांतीची ! आता होळी क्रांतीची !

------------------
 राहशील का तु ?
Girls !, Girls you are the SWEET Gift, 
wonderful gift, most beautiful gift,
GOD'S GIFT ! GOD'S GIFT,
Girls !, Girls you are the GOD'S GIFT !

शालीन तु नित्य संयमी तु
गोड तु मोहक सुंदर तु

आदीशक्ती तु जगत जननी तु
अन्नपूर्णा तु गृहलक्ष्मी तु

Girls !....

कारुण्य रुपी वात्सल्य मुर्ती तु
इश्र्वराचे प्रती रुप माता तु

अंकुश धारी सदा भगीनी तु
आइ समान अशी ताइ तु

Girls !....

देश धर्म रक्षीणी मर्दानी
दुष्ट मर्दीनी रणरागीणी तु

लांघुनी चुल मुल यशस्वी तु
निज स्वरुपी अशीच राहशील का तु ?

Girls !, Girls you are the SWEET Gift, 
wonderful gift, most beautiful gift,
GOD'S GIFT ! GOD'S GIFT,
Girls !, Girls you are the GOD'S GIFT !

----------
मंगेश मेढी...
९८८१४९०१४७




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा