ब्लॉगकट्टा

Netbhet.com

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११

पाऊस अन चाहूल....


सर पावसाची


सर पावसची सर पावसची !
अन चाहुल...!

नव्याची नवलाईची, नव स्वप्नांची,
नव आशेची, नव संधीची, नव वाटेची,
नवारंभाची, नवांकुराची, नव जीवनाची

सर पावसची सर पावसची !
अन चाहुल...!

उत्कर्षाची परिवर्तनाची,
सुगीची, सुखाची, संप्पन्नतेची,
हिरवाईची, धान्य राशीची, फ़ळ फ़ुलांची

सर पावसची सर पावसची !
अन चाहुल...!

चिंब होण्याची, भटकंतीची,
वेडेपणाची, भुलण्याची
भरकटत्या दिवसांची, निथळत्या तिन्हीसांजेची

सर पावसची सर पावसची !
अन चाहुल...!

कस्तुरी वाऱ्याची, दहकत्या गारव्याची
टपोऱ्या थेंबाची, कोसळत्या झऱ्याची
खळाळत्या नदीची, उसळत्या लाटांची

सर पावसची सर पावसची !
अन चाहुल...!

थिरकत्या मोराची बागडत्या वासराची
थरथरत्या पक्षांची, भिरभिरत्या पाखरांची
गुंजरवाची, केकारवाची

सर पावसची सर पावसची !
अन चाहुल...!

प्रणयाची, सृजनाची
बिलगत्या एकांती, गुलाबी श्वासांची
ओल्या चुंबनाची, सप्रेम लावण्याची

सर पावसची सर पावसची !
अन चाहुल...!

हुरहुरत्या विरहाची, नकोश्या एकटेपणाची
सलत्या आठवणींची, हिरव्या जखमांची
कोरड्या प्रतीक्षेची, परतीच्या स्वप्नांची

सर पावसची सर पावसची !
अन चाहुल...!

भिजत्या, हुंदडत्या,
डुंबत्या, माखलेल्या, पोरांची

सर पावसची सर पावसची !
अन चाहुल...!

उत्सवांची, हर्षीत नजरेची,
व्रतांची, जप यज्ञांची,
सखीं सवे झुलण्याची

सर पावसची सर पावसची !
अन चाहुल...!

हरी दर्शनाची, साक्षातकाराची,
आयुष्याच्या सत रूपाची
जे शाश्वत फ़क्त त्याचीच....

मंगेश मेढी...


व्याप...

का कोणाच ठाऊक लोक का कारण देतात | भिजायची खुप ईच्छा पण...कामाचा व्याप
कळ्त नाही त्यांना दाखवायचे काय ? | उपकार करतात का दान करतात का ?

ह्यांना वेळ नाही हे व्यस्त ! आणी पाऊस काय मोकळा स्वस्त !
ईथेही नाटक ढोंगी पणा निसर्गाचा | पावसाचा सच्चे पणा उमजतो कुठे !

खर तर त्याचे काहीच जात नाही | आणी फ़रक तर मुळीच पडत नाही !
त्याचा तो येणार बरसणार | त्याच काम चोख पार पाडणार

ईच्छा असो नसो तो गाठणार | सांगून ठरवून योजना अशी नसते
गमावणार ते ज्यांना कामाचा व्याप | पण हे नंतर जाण्वणार मग झुरणार वर्षभर !

तो येतो व्यापातून सोडवायला | पण हे मागे सरकतात !
तो काही मागत नाही तशी गरजच नाही | उलट भरभरून देतो झोकून देतो

देणे हाच स्वभाव तो देण्या करताच येतो !

प्रसन्न खुल्या दिलाने स्वागत करावे । जसा ज्या वेळी येईल तसा स्वीकारावे 
भिजण्यास एक क्षण ही पुरेसा । काम टाकून भिजावे असे म्हणते कोण ?

बरसणाऱ्या प्रेमात त्याच्या चिंब व्हावे । क्षणभर थांबून स्वत:स ही विसरून 
मग बघा तुम्ही तुम्हालाच भेटाल । अधीकच खुलुन जाताल

म्हणून म्हणतो फ़क्त भिजा । चिंब व्हा मजा करा मस्त रहा

----*----


॥ ॐ  ग़ं  गणपतये नम : ॥

ह्या पाऊसकाळी पाऊसकाळी
मन भुलते हरवते
रानावनात फुला पानात
दरी खोरयात दूर पहाडात
Feel Romance be Romance
Found Romance all Romance
Just Romance Romance Romance
ह्या पाऊसकाळी पाऊसकाळी
मन वाहते झेपावतेo
नदी नाल्यात मुक\त झरयात 
गंधात स्वैर वारयात
Feel Romance be Romance
Found Romance all Romance
Just Romance Romance Romance
ह्या पाऊसकाळी पाऊसकाळी
मन पसरते विसावते
हिरवाईत डोहात
पाऊल वाटेत डोंगर रांगेत 
Feel Romance be Romance
Found Romance all Romance
Just Romance Romance Romance
ह्या पाऊसकाळी पाऊसकाळी
मन गुंतते रुततेo
वेली वेलीत ग्च्च मातीत
शिंपल्यात रेती काठात
Feel Romance be Romance
Found Romance all Romance
Just Romance Romance Romance
ह्या पाऊसकाळी पाऊसकाळी
मन नाचते थिरकते
थेंबा थेंबात पाखरात
मोर पायात पंखात
Feel Romance be Romance
Found Romance all Romance
Just Romance Romance Romance
ह्या पाऊसकाळी पाऊसकाळी
मन फुलते बहरतेo
रान फुलात वनराईत
झाडा झुडपात अंकुरात


मंगेश मेढी...



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा